मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ · शके १९४८तिथी: अष्टमी सकाळी ०६:०५ नंतर नवमीनक्षत्र: धनिष्ठा दुपारी ०४:३४ नंतर शतभिषायोग: वृद्धी सकाळी ०७:५३ नंतर ध्रुवराहूकाळ: दुपारी ०२:४४ - ०४:०३ पर्यंतसूर्योदय / सूर्यास्त: ०६:५० - ०५:२३संपूर्ण पंचांग

Venus Direct in Virgo: कन्या राशीत शुक्र मार्गी या ४ राशींचे चांगले दिवस सुरू होतील; नोकरी व व्यवसायात मोठा फायदा होईल;

Venus Direct in Virgo

रिद्धी सिद्धीच्या या विशेष लेखात तुम्हाला “कन्या राशीत शुक्र मार्गी” Venus Direct in Virgo या ज्योतिषीय स्थितीशी संबंधित संपूर्ण माहिती मिळणार आहे. शुक्र देव १४ नोव्हेंबर २०२६ रोजी कन्या राशीत शुक्र मार्गी होणार आहेत. कन्या राशीत शुक्र नीच अवस्थेत असतात. अशा परिस्थितीत या काळात भावना आणि व्यावहारिक विचार यांच्यात संतुलन राखून पुढे जाणे आवश्यक ठरेल. तसेच, महत्त्वाचे निर्णय घेताना त्यांचा पुन्हा एकदा विचार करणे गरजेचे असेल. चला तर मग, “कन्या राशीत शुक्र मार्गी” या विशेष लेखाची सुरुवात करूया आणि त्याचा सर्व राशींवर होणारा प्रभाव जाणून घेऊया.

वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्राला असुरांचे गुरु शुक्राचार्य म्हणून ओळखले जाते. प्रेम, जीवनसाथी, कला, सुख-सुविधा आणि भौतिक सुखांचा कारक ग्रह म्हणून शुक्राला महत्त्वाचे स्थान आहे. राशिचक्रातील वृषभ राशी आणि तूळ राशींचे स्वामित्व शुक्राकडे आहे. मीन राशीत शुक्र उच्च अवस्थेत, तर कन्या राशीत नीच अवस्थेत असतात. त्यामुळे कन्या राशी शुक्रासाठी अनुकूल मानली जात नाही.

शुक्र सौंदर्य, प्रेम आणि ऐश्वर्य यांचे प्रतिनिधित्व करतो, तर कन्या राशीमध्ये शिस्त, कामकाज आणि तर्कशुद्ध विचारांना महत्त्व दिले जाते. एका बाजूला शुक्र कल्पनाशीलतेचे प्रतीक आहे, तर दुसऱ्या बाजूला कन्या राशी व्यावहारिक दृष्टिकोन दर्शवते. त्यामुळे कन्या राशीत शुक्राला सहज आणि अनुकूल वातावरणाचा अनुभव मिळत नाही.

सविस्तर माहिती येथे पहा

कन्या राशीत शुक्र मार्गी : तिथी आणि वेळ

Venus Transits in Virgo

हिंदू पंचांगानुसार, शुक्र देव १४ नोव्हेंबर २०२६ रोजी कन्या राशीत शुक्र मार्गी होणार आहेत. त्यानंतर २२ नोव्हेंबर २०२६ रोजी ते तूळ राशीत प्रवेश करतील. शुक्र ६ नोव्हेंबर २०२६ रोजी आपल्या नीच राशीत म्हणजेच कन्या राशीत शुक्र वक्री झाले होते. आता तुला राशीत शुक्र मार्गी झाल्यामुळे नातेसंबंध आणि आर्थिक बाबींशी संबंधित विषयांना पुन्हा प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

Marriage Yoga

ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून शुक्र ग्रह

वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्राला प्रेम, सौंदर्य, प्रणय, विवाह, कला, ऐषाराम, धन आणि भौतिक सुख-सुविधांचा कारक ग्रह मानले जाते. जन्मकुंडलीतील शुक्राची स्थिती व्यक्तीचे नातेसंबंध, आर्थिक जीवन, सर्जनशीलता आणि जीवनातील सुख-सुविधा दर्शवते.

बृहत् कुंडली मध्ये दडलेली आहेत तुमच्या जीवनातील अनेक रहस्ये!

शुक्रदेव वृषभ राशी आणि तूळ राशींचे स्वामी आहेत. ते मीन राशीत उच्च, तर कन्या राशीत नीच अवस्थेत असतात. कन्या राशीत शुक्र मार्गी होण्याच्या या स्थितीचा प्रभाव नातेसंबंध, सामाजिक जीवन, आर्थिक निर्णय आणि भावनिक समाधानावर पडू शकतो. तसेच, शुक्रा कडून मिळणारे परिणाम जन्मकुंडलीतील त्यांची स्थिती, बल आणि इतर ग्रहांशी असलेले संबंध यांवर अवलंबून असतात.

कन्या राशीत शुक्र मार्गी : जागतिक स्तरावरील प्रभाव

  • जागतिक स्तरावर हळूहळू आणि तर्कशुद्ध बदल घडून येण्याची शक्यता आहे.
  • कन्या राशीत शुक्र वक्री अवस्थेदरम्यान आरोग्य, विमा आणि आरोग्य विषयक सेवा उद्योगांमध्ये निर्माण झालेल्या समस्यांकडे आता सरकारे आणि कंपन्या अधिक लक्ष देऊ शकतात.
  • अन्नसुरक्षा, सार्वजनिक आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती यांवर अधिक भर दिला जाऊ शकतो.
  • देशांमधील परस्पर संबंध सुधारण्यासाठी व्यावहारिक दृष्टिकोनातून चर्चा होण्याची शक्यता आहे.
  • व्यापार, कामगार कायदे आणि पर्यावरणविषयक आश्वासनांवर विशेष लक्ष दिले जाऊ शकते.
  • बँका आणि गुंतवणूकदार सावध भूमिका घेतील.
  • बाजारपेठेत जोखीम घेण्याचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.
  • सर्व कामे हळूहळू, परंतु स्थिर गतीने पुढे जाऊ शकतात.
  • नफ्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल.
  • आरोग्यसेवा, औषधनिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि डेटा उद्योगांना विशेष महत्त्व प्राप्त होऊ शकते.
  • महागड्या आणि आलिशान वस्तूंच्या ब्रँडमध्ये हळूहळू सुधारणा दिसून येऊ शकते.
  • आरोग्य कर्मचारी, शिक्षक आणि सेवा क्षेत्राशी संबंधित व्यक्ती चर्चेत राहू शकतात.

कन्या राशीत शुक्र मार्गी : प्रभाव

कन्या राशीत शुक्र मार्गी झाल्यामुळे आर्थिक व्यवहार, नातेसंबंध आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांशी संबंधित बाबींमध्ये हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता आहे. या काळात खर्चांचा पुन्हा आढावा घेणे, जवळच्या व्यक्तींसोबत असलेले गैरसमज दूर करणे आणि रखडलेली प्रकरणे चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याची संधी मिळू शकते.

या काळात करिअर आणि कौटुंबिक बाबींमध्ये विचारपूर्वक नियोजन करणे आवश्यक ठरेल. नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि परस्पर समजूतदारपणा ठेवल्यास समस्या दूर होण्यास मदत होईल. कन्या राशीत शुक्र नीच अवस्थेत असल्यामुळे आर्थिक निर्णय घेताना संयम राखणे गरजेचे आहे.

प्रेम जीवनावर प्रभाव

  • प्रेमसंबंध अधिक मधुर आणि व्यावहारिक बनू शकतात. या काळात मोठमोठी आश्वासने देण्यापेक्षा छोट्या-छोट्या कृतींमधून प्रेम व्यक्त केल्यास जोडीदाराचे मन जिंकता येईल. उदाहरणार्थ, स्वयंपाक करणे, समस्या सोडवणे आणि ठरलेल्या वेळी भेटण्यासाठी पोहोचणे यांसारख्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील.
  • कन्या राशीत शुक्र वक्री अवस्थे दरम्यान नातेसंबंधांमध्ये असमाधान जाणवले असेल, तर आता दोघांमधील परस्पर समजूतदार पणा सुधारू शकतो. मजबूत नात्यांमध्ये जवळीक वाढेल, तर केवळ आकर्षणावर टिकून असलेल्या नात्यांचे वास्तव समोर येऊ शकते.
  • अविवाहित व्यक्तींनी विवाहाची घाई करू नये. नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी पुरेसा वेळ घ्यावा. डेटिंग, दीर्घ प्रवास आणि योग्य संवाद यांना महत्त्व द्यावे.
  • जोडीदाराच्या छोट्या-छोट्या सवयींवर टीका करणे टाळावे. कन्या राशीचा स्वभाव चुका शोधण्याकडे झुकणारा असल्यामुळे नातेसंबंधांमध्ये संयम आणि प्रेम टिकवून ठेवणे आवश्यक आहे.

मनोरंजन आणि फॅशन उद्योगावर प्रभाव

  • मनोरंजन, संगीत, फॅशन आणि सौंदर्य प्रसाधन उद्योगांमध्ये बदल दिसून येऊ शकतात. दिखाऊ पणा पेक्षा साधेपणा आणि उत्तम गुणवत्तेला अधिक महत्त्व मिळू शकते.
  • फॅशन क्षेत्रात मोठ्या ब्रँडच्या झगमगाटापेक्षा उत्तम दर्जाच्या कपड्यांची मागणी वाढू शकते. सौंदर्य प्रसाधन उद्योगात त्वचेचे आरोग्य आणि आतड्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिले जाऊ शकते.
  • कलाकारांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. कन्या राशीत शुक्र वक्री अवस्थे दरम्यान रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. संगीतकार, कलाकार आणि सर्जनशील क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना पुढे जाण्याच्या संधी मिळू शकतात. त्यांच्या कौशल्याचे कौतुक होण्याची शक्यता आहे.
Marriage Gunamilan

शुक्राचे शुभ प्रभाव

  • व्यक्तीच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वात, सर्जनशीलतेत आणि कलात्मक क्षमतेत अधिक निखार येतो.
  • फॅशन, डिझाइन, मनोरंजन, महागड्या वस्तूंचे उत्पादन आणि समुपदेशन यांसारख्या क्षेत्रांत यश मिळू शकते.
  • आर्थिक स्थैर्य, संपत्ती आणि सामाजिक संबंधांना प्रोत्साहन मिळते.
  • नाते संबंधांमध्ये प्रेम, वैवाहिक जीवनात सामंजस्य आणि कुटुंबात शांतता टिकून राहण्यास मदत होते.
  • मुत्सद्दी स्वभाव वाढतो, ज्यामुळे मतभेद समजूतदारपणे सोडवण्यास मदत होते.
  • आर्थिक व्यवहारांमधील चर्चा अधिक स्पष्ट होतात आणि जुन्या आर्थिक प्रकरणांचा निपटारा करण्यास मदत मिळू शकते.

शुक्राचे अशुभ प्रभाव

  • प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गैरसमज, भावनिक दुरावा, घटस्फोट आणि तणाव निर्माण होऊ शकतो.
  • चैनीच्या वस्तूंवर होणारा खर्च वाढल्यामुळे आर्थिक परिस्थिती सांभाळण्यात अडचणी येऊ शकतात.
  • प्रजनन क्षमता आणि हार्मोन्सच्या संतुलनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
  • विश्वास किंवा अपेक्षांमधील फरकामुळे व्यावसायिक भागीदारीत अडचणी निर्माण होऊ शकतात.
  • भावनिक अस्वस्थता वाढू शकते आणि सुख-सुविधांमध्ये गरजेपेक्षा जास्त रमण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते.

कन्या राशीत शुक्र मार्गी : राशीनुसार प्रभाव आणि उपाय

मेष राशी

मेष राशीच्या जातकांच्या जन्मकुंडलीत शुक्र ग्रहाला द्वितीय आणि सप्तम भावाचे स्वामित्व प्राप्त आहे. आता तुमच्या षष्ठ भावात गोचर करत असताना कन्या राशीत शुक्र मार्गी होणार आहेत. सामान्यतः षष्ठ भावातील गोचर अनुकूल परिणाम देणारे मानले जात नाही. त्यातच शुक्र कन्या राशीत नीच अवस्थेत….सविस्तर माहिती येथे पहा;

वृषभ राशी

वृषभ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा लग्नभावाचा म्हणजेच राशीचा स्वामी असण्यासोबतच सप्तम भावाचाही स्वामी आहे. आता तुमच्या पंचम भावात गोचर करत असताना कन्या राशीत शुक्र मार्गी होणार आहेत. सामान्यतः पंचम भावातील शुक्राचे गोचर शुभ परिणाम देणारे मानले जाते. मात्र, शुक्र नीच अवस्थेत असल्यामुळे….सविस्तर माहिती येथे पहा;

मिथुन राशी

मिथुन राशीच्या जातकांच्या जन्मकुंडलीत शुक्र ग्रहाला पंचम भावासोबतच द्वादश भावाचेही स्वामित्व प्राप्त आहे. आता तुमच्या चतुर्थ भावात गोचर करत असताना कन्या राशीत शुक्र मार्गी होणार आहेत. सामान्यतः चतुर्थ भावातील शुक्राचे गोचर शुभ परिणाम देणारे मानले जाते. मात्र, शुक्र नीच अवस्थेत असल्यामुळे त्याचे….सविस्तर माहिती येथे पहा;

कर्क राशी

कर्क राशीच्या जातकांच्या जन्मकुंडलीत शुक्र ग्रहाला चतुर्थ भावासोबतच लाभ भावाचेही स्वामित्व प्राप्त आहे. आता तुमच्या तृतीय भावात गोचर करत असताना कन्या राशीत शुक्र मार्गी होणार आहेत. सामान्यतः तृतीय भावातील शुक्राचे गोचर चांगले परिणाम देणारे मानले जाते. मात्र, शुक्र नीच अवस्थेत असल्यामुळे….सविस्तर माहिती येथे पहा;

तुमच्या कुंडलीवर आधारित अचूक शनी रिपोर्ट मिळवा.

सिंह राशी

सिंह राशीच्या जातकांच्या जन्मकुंडलीत शुक्र ग्रहाला करिअर स्थानासोबतच तृतीय भावाचेही स्वामित्व प्राप्त आहे. आता तुमच्या द्वितीय भावात गोचर करत असताना कन्या राशीत शुक्र मार्गी होणार आहेत. सामान्यतः द्वितीय भावातील शुक्राचे गोचर शुभ परिणाम देणारे मानले जाते. मात्र, कर्मस्थानाचा स्वामी नीच अवस्थेत….सविस्तर माहिती येथे पहा;

कन्या राशी

कन्या राशीच्या जातकांच्या जन्मकुंडलीत शुक्र ग्रहाला द्वितीय भावासोबतच भाग्य भावाचेही स्वामित्व प्राप्त आहे. आता तुमच्या प्रथम भावात गोचर करत असताना कन्या राशीत शुक्र मार्गी होणार आहेत. प्रथम भावातील गोचर शुभ परिणाम देणारे मानले जाते. या दृष्टीने कन्या राशीत शुक्र मार्गी झाल्यामुळे….सविस्तर माहिती येथे पहा;

Marriage delay

तूळ राशी

तूळ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा लग्नभावाचा म्हणजेच राशीचा स्वामी असण्यासोबतच अष्टम भावाचाही स्वामी आहे. आता तुमच्या द्वादश भावात गोचर करत असताना कन्या राशीत शुक्र मार्गी होणार आहेत. सामान्यतः द्वादश भावातील शुक्राचे गोचर शुभ परिणाम देणारे मानले जाते. त्यामुळे शुक्र मार्गी झाल्यामुळे परदेशाशी….सविस्तर माहिती येथे पहा;

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या जातकांच्या जन्मकुंडलीत शुक्र ग्रहाला सप्तम भावासोबतच द्वादश भावाचेही स्वामित्व प्राप्त आहे. आता तुमच्या लाभ भावात गोचर करत असताना कन्या राशीत शुक्र मार्गी होणार आहेत. सामान्यतः लाभ भावातील शुक्राचे गोचर शुभ परिणाम देणारे मानले जाते. त्यामुळे शुक्र मार्गी होणे तुमच्यासाठी फायदेशीर….सविस्तर माहिती येथे पहा;

धनु राशी

धनु राशीच्या जातकांच्या जन्मकुंडलीत शुक्र ग्रहाला षष्ठ भावासोबतच लाभ भावाचेही स्वामित्व प्राप्त आहे. आता तुमच्या दशम भावात गोचर करत असताना कन्या राशीत शुक्र मार्गी होणार आहेत. सामान्यतः दशम भावातील शुक्राचे गोचर शुभ परिणाम देणारे मानले जात नाही. त्यातच शुक्र नीच अवस्थेतही असती….सविस्तर माहिती येथे पहा;

मकर राशी

मकर राशीच्या जातकांच्या जन्मकुंडलीत शुक्र ग्रहाला पंचम भावासोबतच दशम भावाचेही स्वामित्व प्राप्त आहे. आता तुमच्या भाग्य स्थानात गोचर करत असताना कन्या राशीत शुक्र मार्गी होणार आहेत. भाग्य भावातील शुक्राचे गोचर शुभ परिणाम देणारे मानले जाते. त्यामुळे शुक्र मार्गी झाल्यामुळे परिस्थितीत….सविस्तर माहिती येथे पहा;

कुंभ राशी

कुंभ राशीच्या जातकांच्या जन्मकुंडलीत शुक्र ग्रहाला चतुर्थ भावासोबतच भाग्य भावाचेही स्वामित्व प्राप्त आहे. आता तुमच्या अष्टम भावात गोचर करत असताना कन्या राशीत शुक्र मार्गी होणार आहेत. सामान्यतः अष्टम भावातील शुक्राचे गोचर बऱ्याच प्रमाणात शुभ परिणाम देणारे मानले जाते.त्यामुळे शुक्र मार्गी झाल्यामुळे जीवनातील….सविस्तर माहिती येथे पहा;

मीन राशी

मीन राशीच्या जातकांच्या जन्मकुंडलीत शुक्र ग्रहाला तृतीय भावासोबतच अष्टम भावाचेही स्वामित्व प्राप्त आहे. आता तुमच्या सप्तम भावात गोचर करत असताना कन्या राशीत शुक्र मार्गी होणार आहेत. सामान्यतः सप्तम भावातील शुक्राचे गोचर शुभ परिणाम देणारे मानले जात नाही. त्यातच शुक्र नीच अवस्थेतही असती….सविस्तर माहिती येथे पहा;

Mangal Dosha

आम्हाला आशा आहे की, तुम्हाला हा लेखही नक्कीच आवडला असेल. रिद्धी सिद्धीसोबत जोडलेले राहिल्याबद्दल आम्ही तुमचे मनःपूर्वक आभार मानतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१) प्रश्न: शुक्र कन्या राशीत कधी मार्गी होणार आहेत?

उत्तर:- शुक्रदेव १४ नोव्हेंबर २०२६ रोजी कन्या राशीत मार्गी होणार आहेत.

२) प्रश्न: शुक्र कन्या राशीत मार्गी झाल्यामुळे कोणत्या राशींवर प्रभाव पडेल?

उत्तर:- शुक्र मार्गी झाल्यामुळे नातेसंबंध, आर्थिक नियोजन, भावनिक स्पष्टता, आरोग्य आणि कौटुंबिक सुख-शांती यांवर प्रभाव पडू शकतो. याचा परिणाम सर्व बारा राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येऊ शकतो.

३) प्रश्न: शुक्र कोणत्या राशींचे स्वामी आहेत?

उत्तर:- ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हे वृषभ आणि तूळ या राशींचे स्वामी आहेत.

४) प्रश्न: कन्या राशीत शुक्र नीच अवस्थेत का मानले जातात?

उत्तर:- वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या ही शुक्राची नीच रास मानली जाते. या राशीत व्यावहारिक विचार, तर्क आणि शिस्त यांना अधिक महत्त्व असल्यामुळे शुक्राच्या प्रेम, सौंदर्य आणि ऐषाराम या कारकत्वांना अनुकूल वातावरण मिळत नाही.

५) प्रश्न: कन्या राशीत शुक्र मार्गी झाल्यामुळे प्रेम आणि आर्थिक जीवनावर काय परिणाम होईल?

उत्तर:- शुक्र मार्गी झाल्यामुळे प्रेमसंबंधांमधील गैरसमज दूर करण्याची संधी मिळू शकते. तसेच, आर्थिक व्यवहारांचे पुनर्नियोजन करण्यास आणि रखडलेल्या आर्थिक बाबी मार्गी लावण्यास मदत होऊ शकते.

ज्या व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात उर्जा हवी आहे त्याच्यासोबत शेअर करा!

लेखकाचा परिचय:

नितीन शर्मा (गुरुजी) हे Ridhhi Sidhhi Astrology Solutions चे संस्थापक आणि ज्योतिष मार्गदर्शक आहेत. आजोबांकडून वडिलांकडे आणि वडिलांकडून त्यांच्यापर्यंत लाभलेला ज्योतिषशास्त्राचा पिढीजात वारसा त्यांनी औपचारिक शिक्षण व पारंपरिक ग्रंथांच्या अभ्यासाने अधिक समृद्ध केला आहे. ICAS मधून ज्योतिष प्रवीणा, ज्योतिष विशारद आणि ज्योतिष भूषण या तीन पदव्या प्राप्त केलेले गुरुजी वैदिक ज्योतिष, कुंडली विश्लेषण, राशीभविष्य आणि ग्रहगोचर यांसह विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन व मार्गदर्शन करतात. पारंपरिक ज्ञान सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे ध्येय आहे.

मार्गदर्शन:

रोज अश्याच नव नवीन माहिती मिळवण्यासाठी

WhatsApp Group Join करा

गुरुजींशी बोला

वैयक्तिक कुंडली सल्ला

जन्मकुंडली, विवाह जुळणी व ग्रहदोष निवारणासाठी वेळ ठरवा.

संबंधित लेख

श्रेणी

सल्ल्यासाठी माहिती पाठवा

अधिक अचूक विश्लेषणासाठी पूर्ण नाव, जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्मस्थळ द्या.

सेवा *
सल्ला कसा हवा? *

पत्ता

Ridhhi Sidhhi Astrology Solutions

१०-ब, स्टेट बँक कॉलोनी,
जय अंबे टायर समोर,
देवपूर, धुळे – ४२४००२

आपल्या प्रश्नांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन देण्यासाठी Ridhhi Sidhhi Astrology Solutions सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहे.

error: Content is protected !!