मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ · शके १९४८तिथी: अष्टमी सकाळी ०६:०५ नंतर नवमीनक्षत्र: धनिष्ठा दुपारी ०४:३४ नंतर शतभिषायोग: वृद्धी सकाळी ०७:५३ नंतर ध्रुवराहूकाळ: दुपारी ०२:४४ - ०४:०३ पर्यंतसूर्योदय / सूर्यास्त: ०६:५० - ०५:२३संपूर्ण पंचांग

Jupiter Transit in Leo 2026: सिंह राशीत गुरुचे संक्रमण; राशी नुसार अनुकूल व प्रतिकूल परिणाम, प्रभाव; ज्योतिषीय उपाय

Jupiter Transit in Leo 2026

वैदिक ज्योतिषशास्त्रात बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रहाला सर्वात शुभ नैसर्गिक ग्रह मानले जाते. गुरु ग्रह भाग्याचा कारक मानला जातो. बृहस्पती ग्रह गुरु, शिक्षक, मार्गदर्शक आणि इतरांना योग्य सल्ला देण्याच्या क्षमतेचे प्रतिनिधित्व करतो. गुरु हा ज्ञानाचा कारक ग्रह आहे. स्त्रीच्या कुंडलीत तो संतती आणि पतीचा नैसर्गिक कारक मानला जातो. जीवनात मिळणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या धनावर गुरु ग्रहाचा प्रभाव असतो, मग ते ज्ञानाचे धन असो, भौतिक साधनसंपत्ती असो, सुख-सुविधा असोत किंवा धार्मिक दृष्टिकोन असो.

आता ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी “सिंह राशीत गुरुचे संक्रमण” Jupiter transit in Leo 2026 करणार आहे. सिंह राशी राजेशाही स्वभाव, नेतृत्वक्षमता आणि प्रतिष्ठेचे प्रतिनिधित्व करते. सिंह राशीत गुरुचे संक्रमण तुमच्यात अहंकाराची भावना वाढवू शकते. मात्र, त्याचबरोबर तुमची सर्जनशीलता, आकर्षण आणि प्रेमसंबंधांमधील ऊर्जा वाढवण्यासही कारणीभूत ठरू शकते. या काळात तुम्ही अधिक प्रभावशाली, आकर्षक आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे धनी बनू शकता.

चला तर मग, पुढे जाऊया आणि सिंह राशीत गुरुचे संक्रमणचा सर्व बारा राशींवर सर्वसाधारणपणे कसा प्रभाव पडू शकतो, हे जाणून घेऊया.

Jupiter transit in Leo 2026

सिंह राशीत गुरुचे संक्रमण

मेष राशी

मेष राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी गुरु नवव्या भावाचा म्हणजेच भाग्य आणि धर्माचा, तसेच बाराव्या भावाचा म्हणजेच खर्च आणि हानीचा स्वामी आहे. ३१ ऑक्टोबर रोजी गुरु तुमच्या पंचम भावात प्रवेश करणार आहे. पंचम भाव शिक्षण, संतती, प्रेम आणि प्रणयाशी संबंधित आहे.

यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, सिंह राशीत गुरुचे संक्रमण केतूसोबत युती निर्माण करेल, कारण केतू आधीपासूनच या राशीत स्थित आहे. त्यामुळे पंचम भावातील केतूमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांपासून आता काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि शैक्षणिक कामगिरी सुधारण्यासाठी अनुकूल ठरू शकतो. नवव्या भावाचा स्वामी म्हणून गुरुचा पंचम भावातील प्रवेश तुम्हाला गुरुजन, शिक्षक आणि मार्गदर्शकांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळण्याचे संकेत देतो.

मेष राशीतील ज्या जातकांना आतापर्यंत प्रेमसंबंधांमध्ये वाद किंवा आव्हानांचा सामना करावा लागत होता, त्यांच्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. काही जातकांचे प्रेमसंबंधां साखरपुडा किंवा विवाहापर्यंत पोहोचू शकतात.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, या राशीतील जे जातक संततीप्राप्तीसाठी प्रयत्नशील होते आणि त्यांना काही अडथळ्यांचा सामना करावा लागत होता, त्यांना या काळात शुभवार्ता मिळण्याचे संकेत आहेत. बाराव्या भावाचा स्वामी म्हणून गुरुचा पंचम भावातील प्रवेश आणखी एक महत्त्वाचा संकेत देतो.

या काळात परदेशातील गुरु, दूरच्या ठिकाणी असलेले मार्गदर्शक किंवा परदेशी संस्थांकडून तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्ही परदेशात शिक्षण घेण्यासाठी किंवा एखाद्या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज केला असेल, तर त्यातून सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. काही जातकांच्या आयुष्यात परदेशी संस्कृतीशी संबंधित किंवा वेगळ्या पार्श्वभूमीचा जोडीदार येऊ शकतो.

मात्र, या काळात शिक्षण आणि संततीशी संबंधित खर्च वाढू शकतात. त्यामुळे आर्थिक नियोजन करून पुढे जाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, संततीच्या आरोग्याची आणि देखभालीची विशेष काळजी घ्या.

आता गुरुच्या दृष्टीमुळे होणाऱ्या परिणामांविषयी जाणून घेऊया. पंचम भावातून गुरुची पाचवी दृष्टी नवव्या भावावर पडेल. त्यामुळे वडील आणि गुरुजनांचे आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे.

गुरुची सातवी दृष्टी एकादश भावावर पडल्यामुळे तुमच्या भौतिक इच्छा पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. उत्पन्नाचे स्रोत वाढण्यासोबतच सामाजिक संपर्कांचाही विस्तार होण्याची शक्यता आहे.

गुरुची नववी दृष्टी लग्न भावावर पडल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल दिसून येतील. तसेच, आरोग्यात सुधारणा होण्यासोबतच तुमची प्रगल्भता आणि बुद्धिमत्ताही वाढू शकते.

उपाय: गुरुवारी केळीच्या झाडाचे मूळ सोन्यात मढवून पिवळ्या सुती धाग्यात बांधून धारण करा.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी गुरु आठव्या भावाचा म्हणजेच अचानक घडणाऱ्या घटना आणि अनिश्चिततेचा, तसेच एकादश भावाचा म्हणजेच लाभ आणि इच्छापूर्तीचा स्वामी आहे. ३१ ऑक्टोबर रोजी गुरु तुमच्या चतुर्थ भावात प्रवेश करणार आहे. चतुर्थ भाव माता, भावना, घर, मातृभूमी, सुख-सुविधा आणि कौटुंबिक जीवनाशी संबंधित आहे.

गुरु हा तुमच्या लग्नेशाचा मित्र ग्रह मानला जात नसला, तरी तो नैसर्गिक शुभ ग्रह असल्यामुळे सिंह राशीत गुरुचे संक्रमण सकारात्मक परिणाम देऊ शकते. या राशीत आधीपासून स्थित असलेल्या केतूसोबत गुरुची युती होणार असल्यामुळे चतुर्थ भावाशी संबंधित समस्यांमधून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

या राशीतील ज्या जातकांच्या मातोश्रींची प्रकृती ठीक नव्हती, त्यांच्या आरोग्यात सुधारणा दिसून येऊ शकते. तसेच, आईसोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ होऊ शकतात. तुम्हाला आपल्या भावना व्यक्त करताना अडचणी येत असतील, तर आता तुम्ही अधिक मोकळेपणाने आपले विचार मांडू शकाल.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, राजकारण किंवा नेतृत्वाच्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या आणि जनतेच्या विरोधाचा सामना करणाऱ्या जातकांना लोकांच्या समस्या सोडवून त्यांचा पाठिंबा मिळवण्याची संधी मिळू शकते. तुम्ही घर, मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा अथवा घराचा विस्तार करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ त्यासाठी अनुकूल ठरू शकतो.

एकादश भावाचा स्वामी म्हणून गुरुचा चतुर्थ भावातील प्रवेश धन आणि गुंतवणुकीतून मिळालेली रक्कम घर, मालमत्ता किंवा कौटुंबिक गरजांवर खर्च होण्याचे संकेत देतो. मात्र, अष्टम भावाचा स्वामी असल्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या घटना आणि अनपेक्षित परिस्थितींबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.

आता गुरुच्या दृष्टीमुळे होणाऱ्या परिणामांविषयी जाणून घेऊया. चतुर्थ भावातून गुरुची पाचवी दृष्टी अष्टम भावावर पडेल. त्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या समस्या आणि अनिश्चित परिस्थितींवर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते. तसेच, गूढ विद्यांमधील तुमची रुची वाढण्याची शक्यता आहे.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, गुरुची सातवी दृष्टी दशम भावावर पडल्यामुळे करिअरमध्ये प्रगती होण्यासोबतच सार्वजनिक प्रतिष्ठेतही वाढ होऊ शकते. तर गुरुची नववी दृष्टी द्वादश भावावर पडल्यामुळे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

उपाय: घरात सत्यनारायण पूजेचे आयोजन करा आणि आपल्या मातोश्रींना किंवा मातेसमान असलेल्या एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू द्या.

Marriage Yoga

मिथुन राशी

मिथुन राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी गुरु दशम भावाचा म्हणजेच व्यावसायिक जीवन आणि सार्वजनिक प्रतिमेचा, तसेच सप्तम भावाचा म्हणजेच विवाह आणि भागीदारीचा स्वामी आहे. आता ३१ ऑक्टोबर रोजी गुरु तुमच्या तृतीय भावात प्रवेश करणार आहे. तृतीय भाव लहान भाऊ-बहिणी, संवाद, धैर्य, आवडीनिवडी आणि शेजार यांच्याशी संबंधित आहे.

सिंह राशीतील गुरुचे हे संक्रमण केतूसोबत युती निर्माण करेल, कारण केतू आधीपासूनच या राशीत स्थित आहे. त्यामुळे तृतीय भावातील केतूमुळे निर्माण झालेल्या समस्यांपासून आता काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या काही काळापासून लहान भाऊ-बहिणी, चुलत भाऊ-बहिणी किंवा शेजाऱ्यांसोबत कोणत्याही प्रकारचे वाद सुरू असतील, तर या संक्रमणाच्या प्रभावामुळे ते मिटण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल. तुमची वाणी आणि संवादशैली अधिक प्रगल्भ, प्रभावी आणि ज्ञानपूर्ण होईल.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, मिथुन राशीचे जे जातक प्रसारमाध्यमे, शिक्षण, बँकिंग, समुपदेशन किंवा संवादाशी संबंधित क्षेत्रांत कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ व्यावसायिकदृष्ट्या अनुकूल ठरू शकतो. तसेच, या काळात अनेक मिथुन राशीचे जातक नवीन आवडीनिवडी किंवा छंद जोपासू शकतात.

दशम भावाचा स्वामी म्हणून गुरुचा तृतीय भावातील प्रवेश कामानिमित्त कमी अंतराचे प्रवास घडण्याचे संकेत देत आहे. फ्रीलान्सर म्हणून काम करणारे जातक आपल्या परिसरात नवीन कार्यालयही सुरू करू शकतात.

यासोबतच, सप्तम भावाचा स्वामी म्हणून गुरुची ही स्थिती असे दर्शवते की, तुम्ही लहान भाऊ-बहिणी किंवा नातेवाईकांसोबत नवीन भागीदारी सुरू केल्यास त्यात यश मिळण्याची शक्यता आहे.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, आता गुरुच्या दृष्टीमुळे होणाऱ्या परिणामांविषयी जाणून घेऊया. तृतीय भावातून गुरुची पाचवी दृष्टी सप्तम भावावर पडेल. त्यामुळे वैवाहिक जीवनात सुख आणि सामंजस्य वाढण्याची शक्यता आहे. गुरुची सातवी दृष्टी नवव्या भावावर पडल्यामुळे या काळात तुम्हाला वडिलांचे प्रेम, सहकार्य आणि आशीर्वाद मिळू शकतात.

गुरुची नववी दृष्टी एकादश भावावर पडल्यामुळे गुंतवणूक वाढवणे, आर्थिक लाभ मिळवणे आणि इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने हा काळ अत्यंत अनुकूल ठरू शकतो.

उपाय: भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करा आणि नियमितपणे विष्णुसहस्रनामाचे पठण करा.

कर्क राशी

कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी गुरु नवव्या भावाचा म्हणजेच भाग्य आणि धर्माचा, तसेच सहाव्या भावाचा म्हणजेच रोग, ऋण आणि शत्रूंचा स्वामी आहे. आता ३१ ऑक्टोबर रोजी गुरु तुमच्या द्वितीय भावात प्रवेश करणार आहे. द्वितीय भाव वाणी, धन, बचत आणि जवळच्या कुटुंबाशी संबंधित बाबींचे प्रतिनिधित्व करतो.

सिंह राशीतील गुरुचे हे संक्रमण केतूसोबत युती निर्माण करेल, कारण केतू आधीपासूनच या राशीत स्थित आहे. त्यामुळे द्वितीय भावातील केतूळे निर्माण झालेल्या समस्यांपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत मतभेद किंवा दुरावा निर्माण झाला असेल, तर त्यात सुधारणा होऊ शकते. तसेच, गेल्या काही काळापासून तोंडाशी संबंधित काही समस्या जाणवत असतील, तर त्यावर अधिक चांगले उपचार मिळण्याची शक्यता आहे.

गुरुचा द्वितीय भावातील प्रवेश झाल्यामुळे कुटुंबातील सकारात्मकता वाढू शकते. तसेच, कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होण्याचे योगही निर्माण होऊ शकतात.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, हा काळ तुमची बचत आणि बँकेतील शिल्लक वाढवण्यासाठी अनुकूल ठरू शकतो. यासोबतच, कौटुंबिक संपत्ती आणि वारसाहक्काने मिळणाऱ्या मालमत्तेलाही बळकटी मिळण्याची शक्यता आहे.

मात्र, या काळाची दुसरी बाजूही असू शकते. या दरम्यान चविष्ट, तेलकट किंवा जड पदार्थ खाण्याची इच्छा वाढू शकते. परंतु, अशा आहारामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्यासोबतच वजनही वाढू शकते.

सहाव्या भावाचा स्वामी म्हणून गुरुचा द्वितीय भावातील प्रवेश तुम्हाला इतरांच्या समस्या सोडवून उत्पन्न मिळवण्याची संधी देऊ शकतो. विशेषतः डॉक्टर, वकील आणि समुपदेशकांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो.

नवव्या भावाचा स्वामी म्हणून गुरुचे हे संक्रमण द्वितीय भावासाठी शुभ परिणाम देऊ शकते. तुम्ही कुटुंबासोबत धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होऊ शकता. तसेच, तीर्थयात्रेचे नियोजन करण्याचीही शक्यता आहे.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, आता गुरुच्या दृष्टीमुळे होणाऱ्या परिणामांविषयी जाणून घेऊया. द्वितीय भावातून गुरुची पाचवी दृष्टी सहाव्या भावावर पडेल. त्यामुळे कर्ज आणि आरोग्याशी संबंधित बाबींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असेल.

गुरुची सातवी दृष्टी अष्टम भावावर पडल्यामुळे जीवनातील अनिश्चित परिस्थितींवर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते. तसेच, गूढ विद्यांमधील तुमची रुची वाढण्याची शक्यता आहे. गुरुची नववी दृष्टी दशम भावावर पडल्यामुळे करिअर आणि व्यावसायिक जीवनात प्रगती होण्याचे संकेत मिळत आहेत.

उपाय: दररोज गुरु बीज मंत्राचा १०८ वेळा जप करा.

सिंह राशी

सिंह राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी गुरु पंचम भावाचा म्हणजेच शिक्षण, प्रेमसंबंध आणि संततीचा, तसेच अष्टम भावाचा म्हणजेच अचानक घडणाऱ्या घटना, रहस्य आणि परिवर्तनाचा स्वामी आहे. आता ३१ ऑक्टोबर रोजी गुरु तुमच्या लग्न भावात म्हणजेच प्रथम भावात प्रवेश करणार आहे. हा भाव तुमचे व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास आणि स्वतःचे अस्तित्व दर्शवतो.

सिंह राशीतील गुरुचे हे संक्रमण केतूसोबत युती निर्माण करेल, कारण केतू आधीपासूनच या राशीत स्थित आहे. त्यामुळे लग्न भावातील केतूमुळे आतापर्यंत तुमच्या जीवनात निर्माण होणाऱ्या आव्हानांपासून आणि संभ्रमाच्या परिस्थितीतून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

गुरुचे हे संक्रमण तुमच्यासाठी प्रगतीकारक ठरू शकते. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी, लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि लोकांमध्ये आपली प्रतिमा अधिक मजबूत करण्यासाठी हा काळ अनुकूल राहण्याची शक्यता आहे.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, विशेषतः या राशीतील कलाकार, जनसमुदायासोबत काम करणाऱ्या व्यक्ती, राजकारणी, समाजसेवक आणि सामाजिक नेतृत्वाशी संबंधित लोकांसाठी हा काळ शुभ संकेत घेऊन येऊ शकतो. नवीन उद्योजक आणि व्यवसायाशी संबंधित व्यक्तीही लोकांच्या नजरेत येऊ शकतात.

पंचम भावाचा स्वामी म्हणून गुरुचा लग्न भावातील प्रवेश असे संकेत देतो की, तुमच्या व्यक्तिमत्त्वातील गुण, शिक्षण, सर्जनशीलता, अभिनयकला आणि यश यांमुळे तुम्हाला सन्मान मिळू शकतो.

मात्र, गुरुचा लग्न भावातील प्रवेश काही परिस्थितींमध्ये वजन वाढण्याची किंवा आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यताही दर्शवतो. सध्याची दशा अनुकूल नसेल, तर आरोग्याची विशेष काळजी घ्या.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, दुसरीकडे, संशोधन, पीएच.डी., विज्ञान, ज्योतिषशास्त्र, न्यूरोलॉजी आणि टॅरो रीडिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये रुची असलेल्या जातकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरू शकतो.

आता गुरुच्या दृष्टीमुळे होणाऱ्या परिणामांविषयी जाणून घेऊया. लग्न भावातून गुरुची पाचवी दृष्टी पंचम भावावर पडेल. त्यामुळे शिक्षण, संतती, प्रेम आणि प्रणयाशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती साधता येईल. अविवाहित जातकांच्या आयुष्यात नवीन नातेसंबंध निर्माण होऊ शकतात. तसेच, संततीप्राप्तीची इच्छा असणाऱ्या जातकांना शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.

गुरुची सातवी दृष्टी सप्तम भावावर पडल्यामुळे विवाह आणि भागीदारीशी संबंधित बाबींमध्ये अनुकूलता निर्माण होऊ शकते. प्रेमसंबंधांचे विवाहात रूपांतर होण्याची शक्यता आहे. याशिवाय, गुरुची नववी दृष्टी नवव्या भावावर पडल्यामुळे भाग्य अधिक बळकट होईल. तसेच, वडील, गुरुजन आणि मार्गदर्शकांचे सहकार्य व आशीर्वाद मिळू शकतात.

उपाय: दररोज आपल्या कपाळावर केशराचा टिळा लावा.

Marriage Gunamilan

कन्या राशी

कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी गुरु चतुर्थ भावाचा म्हणजेच भावना, घर, माता, सुख-सुविधा आणि कौटुंबिक जीवनाचा, तसेच सप्तम भावाचा म्हणजेच विवाह आणि भागीदारीचा स्वामी आहे. आता ३१ ऑक्टोबर रोजी गुरु तुमच्या द्वादश भावात प्रवेश करणार आहे. द्वादश भाव खर्च, हानी, एकांत आणि परदेशाशी संबंधित बाबी दर्शवतो.

सिंह राशीतील गुरुचे हे संक्रमण केतूसोबत युती निर्माण करेल. केतूच्या आधीपासून असलेल्या उपस्थितीमुळे तुमचा कल आध्यात्मिकतेकडे वाढत आहे. आता गुरुच्या संक्रमणामुळे या प्रवृत्तीला आणखी चालना मिळू शकते.

या काळात तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. तसेच, तुम्ही अधिक आध्यात्मिक आणि आत्मचिंतनशील बनण्यासोबतच एकांतात वेळ घालवणे पसंत करू शकता. आध्यात्मिकतेमध्ये रुची असलेले कन्या राशीचे जातक एखाद्या धार्मिक स्थळाला, आश्रमाला, ध्यान केंद्राला किंवा योग केंद्राला भेट देऊ शकतात.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, या संक्रमणामुळे परदेश प्रवासाचे नियोजन करण्याची, परदेशातून लाभ मिळवण्याची किंवा परदेशी व्यक्तींच्या संपर्कात येण्याची संधी मिळू शकते.

चतुर्थ भावाचा स्वामी म्हणून गुरुचा द्वादश भावातील प्रवेश परदेशात स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या किंवा परदेशात अथवा दूरच्या ठिकाणी मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखणाऱ्या जातकांसाठी अनुकूल ठरू शकतो. सध्याची दशा अनुकूल नसेल, तर आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो.

सप्तम भावाचा स्वामी म्हणून गुरुचे हे संक्रमण परदेशी व्यक्तींसोबत भागीदारी करण्याच्या संधी निर्माण करू शकते. अविवाहित जातकांना परदेशातून विवाहा प्रस्तावही मिळू शकतात. मात्र, या काळात जीवनसाथीच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक राहील.

आता गुरुच्या दृष्टीमुळे होणाऱ्या परिणामांविषयी जाणून घेऊया. द्वादश भावातून गुरुची पाचवी दृष्टी चतुर्थ भावावर पडेल. त्यामुळे घर बांधणे, घर खरेदी करणे किंवा घरातील सुख-सुविधांवर खर्च होण्याची शक्यता आहे. तसेच, कौटुंबिक वातावरणही आनंददायी राहू शकते.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, गुरुची सातवी दृष्टी सहाव्या भावावर पडल्यामुळे कर्जाचे प्रमाण वाढू शकते. मात्र, सेवा क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. गुरुची नववी दृष्टी अष्टम भावावर पडल्यामुळे जीवनातील अनिश्चित परिस्थितींवर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते. तसेच, संशोधन कार्यात यश मिळण्यासोबतच गूढ विद्यांमधील रुचीही वाढू शकते.

उपाय: दररोज शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करा.

तुला राशी

तुला राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी गुरु तृतीय भावाचा म्हणजेच भाऊ-बहिणी, संवाद, साहस, आवडीनिवडी आणि शेजाराशी संबंधित बाबींचा, तसेच षष्ठ भावाचा म्हणजेच रोग, कर्ज आणि दैनंदिन आव्हानांचा स्वामी आहे. आता ३१ ऑक्टोबर रोजी गुरु तुमच्या एकादश भावात प्रवेश करणार आहे. एकादश भाव धनलाभ, इच्छापूर्ती आणि सामाजिक संपर्कांचे प्रतिनिधित्व करतो.

सिंह राशीतील गुरुचे हे संक्रमण केतूसोबत युती निर्माण करेल, कारण केतू आधीपासूनच या भावात स्थित आहे. त्यामुळे एकादश भावातील केतूमुळे तुमच्या जीवनात आतापर्यंत निर्माण होत असलेल्या अडथळ्यांमधून आणि असमाधानाच्या परिस्थितीतून आता काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

या संक्रमणादरम्यान तुमचा उच्चपदस्थ अधिकारी, सरकारी प्रतिनिधी किंवा प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क येऊ शकतो. या संपर्कांमुळे आर्थिक संधी आणि लाभाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, या काळात काही जातकांच्या व्यावसायिक संपर्कांमध्ये आणि सामाजिक वर्तुळात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून सामाजिकदृष्ट्या एकटे पडल्याची भावना अनुभवणारे या राशीचे जातक पुन्हा लोकांशी जोडले जाऊ शकतात.

गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्येही वाढ होण्याचे संकेत आहेत. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. तसेच, या काळात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होण्याचे योग निर्माण होऊ शकतात.

तृतीय भावाचा स्वामी म्हणून गुरुचा एकादश भावातील प्रवेश असे दर्शवतो की तुमचे संवादकौशल्य, साहस आणि व्यक्तिमत्त्व इतरांवर प्रभाव पाडण्यास मदत करेल. तसेच, तुम्ही तुमचे जुने छंद आणि आवडीनिवडी पुन्हा जोपासू शकता.

मात्र, षष्ठ भावाचा स्वामी म्हणून गुरुचे हे संक्रमण असेही सूचित करते की इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते किंवा सामाजिक वर्तुळातील एखाद्या व्यक्तीला पैसे उधार द्यावे लागू शकतात. असे आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. विशेषतः तुमची सध्याची दशा अनुकूल नसेल, तर दिलेले पैसे अडकण्याची किंवा मित्रांसोबत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, आता गुरुच्या दृष्टीमुळे होणाऱ्या परिणामांविषयी जाणून घेऊया. गुरुची पाचवी दृष्टी तृतीय भावावर पडल्यामुळे संवादकौशल्य, साहस आणि आत्मविश्वासात वाढ होईल. तसेच, लहान भाऊ-बहिणींसोबतचे संबंध अधिक चांगले होऊ शकतात.

गुरुची सातवी दृष्टी पंचम भावावर पडल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती करण्याच्या संधी मिळतील. अविवाहित जातकांच्या जीवनात नवीन प्रेमसंबंध निर्माण होऊ शकतात. तसेच, संततीची इच्छा असणाऱ्या जातकांना शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.

गुरुची नववी दृष्टी सप्तम भावावर पडल्यामुळे विवाह आणि वैवाहिक जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. तसेच, नातेसंबंधांमध्ये सामंजस्य वाढण्यास मदत होईल.

उपाय: गुरुवारी केळीच्या झाडाला हळद मिसळलेले पाणी अर्पण करून त्याची पूजा करा.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी गुरु द्वितीय भावाचा म्हणजेच धन, बचत, कुटुंब आणि वाणीचा, तसेच पंचम भावाचा म्हणजेच शिक्षण, संतती, प्रेम आणि प्रणयाचा स्वामी आहे. आता ३१ ऑक्टोबर रोजी गुरु तुमच्या दशम भावात प्रवेश करणार आहे. दशम भाव करिअर, व्यावसायिक जीवन आणि सार्वजनिक प्रतिमेशी संबंधित आहे.

सिंह राशीतील गुरुचे हे संक्रमण केतूसोबत युती निर्माण करेल. या युतीच्या प्रभावामुळे मागील काही काळापासून करिअर किंवा वैवाहिक जीवनात जाणवत असलेले असमाधान आणि दिशेचा अभाव यामध्ये आता हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हे संक्रमण करिअरमधील प्रगती, पदोन्नती आणि नवीन संधींचे संकेत देत आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकते आणि प्रगतीच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

या राशीतील अनेक जातकांना वरिष्ठ अधिकारी, गुरुजन किंवा मार्गदर्शक व्यक्तींचे सहकार्य मिळू शकते. द्वितीय भावाचा स्वामी म्हणून गुरुचा दशम भावातील प्रवेश असे दर्शवतो की तुमची वाणी आणि संवादकौशल्य कामाच्या ठिकाणी तुमची सर्वात मोठी ताकद ठरू शकते. विशेषतः समुपदेशन, प्रशिक्षण, शिक्षण किंवा संवादाशी संबंधित क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींना याचा लाभ मिळू शकतो.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, या संक्रमणामुळे तुमच्या व्यावसायिक प्रगतीमध्ये कुटुंबाचे सहकार्यही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित व्यक्तींसाठीदेखील हा काळ अनुकूल ठरू शकतो.

पंचम भावाचा स्वामी म्हणून गुरुचा दशम भावातील प्रवेश या राशीतील नव्याने पदवी प्राप्त केलेल्या जातकांसाठी करिअरची चांगली सुरुवात करण्याच्या आणि अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली पुढे जाण्याच्या संधी निर्माण करू शकतो.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, आता गुरुच्या दृष्टीमुळे होणाऱ्या परिणामांविषयी जाणून घेऊया. गुरुची पाचवी दृष्टी द्वितीय भावावर पडल्यामुळे बचत आणि बँकेतील शिल्लक वाढण्याची शक्यता आहे. तसेच, कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक दृढ होऊ शकतात. विवाह किंवा संततीमुळे कुटुंबाचा विस्तार होण्याची शक्यताही आहे.

गुरुची सातवी दृष्टी चतुर्थ भावावर पडल्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. तसेच, कौटुंबिक जीवनात सुख-समाधान टिकून राहण्याची शक्यता आहे. गुरुची नववी दृष्टी षष्ठ भावावर पडल्यामुळे सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या जातकांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

उपाय: दररोज भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करून त्यांची प्रार्थना करा.

Marriage delay

धनु राशी

धनु राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी गुरु लग्न भावाचा म्हणजेच शरीर, व्यक्तिमत्त्व आणि स्वतःशी संबंधित बाबींचा, तसेच चतुर्थ भावाचा म्हणजेच घर, सुख-सुविधा आणि कौटुंबिक जीवनाचा स्वामी आहे. आता ३१ ऑक्टोबर रोजी गुरु तुमच्या नवम भावात प्रवेश करणार आहे. नवम भाव भाग्य, धर्म, उच्च शिक्षण आणि जीवनातील मार्गदर्शनाशी संबंधित मानला जातो.

यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, सिंह राशीतील गुरुचे हे संक्रमण केतूसोबत युती निर्माण करेल, कारण केतू आधीपासूनच या राशीत स्थित आहे. या संक्रमणामुळे धनु राशीच्या जातकांसाठी उच्च शिक्षणाच्या नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

मागील काही काळापासून केतूच्या प्रभावामुळे उच्च शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण किंवा पुढील शिक्षणासंबंधी संभ्रम किंवा अडथळे निर्माण होत असतील, तर आता त्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे.

या काळात तुमच्या जीवनात एखाद्या गुरु, मार्गदर्शक किंवा सल्लागार व्यक्तीचे आगमन होऊ शकते. ही व्यक्ती तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यास मदत करेल. तुम्ही एखाद्या प्रतिष्ठित किंवा सरकारी शैक्षणिक संस्थेशी जोडले जाऊ शकता किंवा शिक्षणाशी संबंधित कारणांसाठी लांबचा प्रवास करू शकता. दूरच्या ठिकाणी असलेल्या गुरुशी किंवा ज्ञानाच्या स्रोताशी संपर्क निर्माण होण्याची शक्यताही आहे.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, याशिवाय, या संक्रमणादरम्यान वडिलांच्या जीवनातही सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. मागील काही काळापासून वडिलांसोबत दुरावा, मतभेद किंवा भावनिक तणाव जाणवत असेल, तर आता त्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यांचे प्रेम आणि सहकार्यही तुम्हाला मिळू शकते.

लग्नेश म्हणून गुरुचा नवम भावातील प्रवेश तुम्हाला धर्म, आध्यात्मिक कार्य आणि जीवनाच्या सखोल अर्थाकडे आकर्षित करू शकतो. तुम्ही एखाद्या तीर्थयात्रेचे नियोजन करू शकता किंवा धार्मिक संस्था अथवा मंदिराशी जोडले जाऊ शकता.

चतुर्थ भावाचा स्वामी म्हणून नवम भावातील गुरुचे संक्रमण असेही दर्शवते की या काळात धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यांमधून तुम्हाला भावनिक शांती आणि समाधान मिळू शकते. एखाद्या धार्मिक स्थळाशी किंवा संस्थेशी तुमची विशेष जवळीक निर्माण होऊ शकते.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, आता गुरुच्या दृष्टीमुळे होणाऱ्या परिणामांविषयी जाणून घेऊया. गुरुची पाचवी दृष्टी लग्न भावावर पडल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. आरोग्यात सुधारणा होण्यासोबतच उच्च ज्ञान प्राप्तीचे योगही निर्माण होऊ शकतात.

गुरुची सातवी दृष्टी तृतीय भावावर पडल्यामुळे संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि साहसात वाढ होईल. तसेच, गुरुची नववी दृष्टी पंचम भावावर पडल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचा काळ राहील. अविवाहित जातकांच्या जीवनात नवीन प्रेमसंबंधांची सुरुवात होण्याची शक्यताही आहे.

उपाय: गुरुवारी सोन्याच्या अंगठीत जडवलेला पिवळा पुष्कराज उजव्या हाताच्या तर्जनी बोटात धारण करा.

मकर राशी

मकर राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी गुरु तृतीय भावाचा म्हणजेच लहान भाऊ-बहिणी, नातेवाईक, संवाद आणि साहसाशी संबंधित बाबींचा, तसेच द्वादश भावाचा म्हणजेच खर्च, हानी आणि परदेशाशी संबंधित बाबींचा स्वामी आहे. आता ३१ ऑक्टोबर रोजी गुरु तुमच्या अष्टम भावात प्रवेश करणार आहे. अष्टम भाव अनिश्चितता, रहस्य, परिवर्तन आणि गूढ विद्यांशी संबंधित मानला जातो.

सिंह राशीतील गुरुचे हे संक्रमण केतूसोबत युती निर्माण करेल. या युतीमुळे तुम्ही गूढ विषय, जीवनातील रहस्ये आणि सखोल अभ्यासाकडे अधिक आकर्षित होऊ शकता. आतापर्यंत तुम्ही अशा विषयांकडे गांभीर्याने लक्ष दिले नसेल, तर या काळात ज्योतिषशास्त्र, रहस्यविज्ञान, संशोधन आणि जीवनातील सखोल पैलूंबद्दल तुमची रुची वाढू शकते.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, या संक्रमणामुळे जीवनात काही अचानक बदल आणि अनिश्चित परिस्थिती निर्माण होऊ शकतात. मात्र, त्याच वेळी या परिस्थिती तुम्हाला आंतरिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवण्यास आणि तुमच्यात परिवर्तन घडवून आणण्यास मदत करू शकतात.

तुम्ही स्वतःला संशोधन, विश्लेषण आणि सखोल अभ्यासात अधिक व्यस्त ठेवू शकता. विशेषतः संशोधन क्षेत्र, पीएच.डी. किंवा सखोल अभ्यासाशी संबंधित व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो.

द्वादश भावाचा स्वामी म्हणून गुरुचा अष्टम भावातील प्रवेश विपरीत राजयोग निर्माण करू शकतो. याचा अर्थ असा की जीवनात आव्हाने निर्माण होतील, परंतु तुमची बुद्धिमत्ता आणि क्षमता याच परिस्थितींचे संधीत रूपांतर करण्यास मदत करू शकते.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, संशोधन कार्य, योग किंवा ध्यानासाठी तुम्हाला काही काळ एकांतात घालवण्याची इच्छा होऊ शकते. मात्र, तुमची सध्याची दशा अनुकूल नसेल, तर आरोग्य आणि दैनंदिन दिनचर्येबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

तृतीय भावाचा स्वामी म्हणून गुरुचा अष्टम भावातील प्रवेश असे संकेत देतो की लहान भाऊ-बहिणींच्या जीवनात काही आव्हाने निर्माण होऊ शकतात. संवाद साधताना थोडा गोंधळ होण्याची किंवा आपल्या भावना व्यक्त करण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. काही बाबतीत तुम्ही वैयक्तिक किंवा गोपनीय चर्चेला अधिक प्राधान्य देऊ शकता.

आता गुरुच्या दृष्टीमुळे होणाऱ्या परिणामांविषयी जाणून घेऊया. गुरुची पाचवी दृष्टी द्वादश भावावर पडल्यामुळे खर्चात वाढ होऊ शकते.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, गुरुची सातवी दृष्टी द्वितीय भावावर पडल्यामुळे बचत आणि बँकेतील शिल्लक सुधारू शकते. तसेच, गुरुची नववी दृष्टी चतुर्थ भावावर पडल्यामुळे कौटुंबिक सुखात वाढ होण्यासोबतच घरातील वातावरणही अधिक आनंददायी होऊ शकते.

उपाय: दररोज अंघोळीच्या पाण्यात थोडी हळद आणि केशर मिसळून स्नान करा.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी गुरु द्वितीय भावाचा म्हणजेच धन, बचत, वाणी आणि जवळच्या कुटुंबाशी संबंधित बाबींचा, तसेच एकादश भावाचा म्हणजेच सामाजिक वर्तुळ, लाभ आणि इच्छापूर्तीचा स्वामी आहे. आता ३१ ऑक्टोबर रोजी गुरु तुमच्या सप्तम भावात प्रवेश करणार आहे. सप्तम भाव विवाह, भागीदारी आणि सार्वजनिक संबंधांशी संबंधित मानला जातो.

सिंह राशीतील गुरुचे हे संक्रमण केतूसोबत युती निर्माण करेल, कारण केतू आधीपासूनच या भावात स्थित आहे. केतूच्या प्रभावामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात काही आव्हाने निर्माण होत होती. अशा परिस्थितीत गुरुचे हे संक्रमण त्या समस्यांमधून दिलासा मिळवून देण्यास मदत करू शकते.

सप्तम भाव इतर व्यक्ती आणि सार्वजनिक ओळखीशीही संबंधित मानला जातो. त्यामुळे या काळात लोकांमध्ये तुमची लोकप्रियता वाढू शकते आणि तुमची ओळख अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे.

विशेषतः या राशीतील जे जातक मीडिया, टेलिव्हिजन, चित्रपट, सोशल मीडिया आणि सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी हा काळ लोकप्रियता आणि नवी ओळख मिळवून देणारा ठरू शकतो.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, विवाहयोग्य वय असलेल्या या राशीतील जातकांना या काळात विवाहाचे प्रस्ताव मिळण्यासोबतच लग्नाच्या अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात. वैवाहिक जीवनात दुरावा किंवा मतभेद अनुभवणाऱ्या जातकांसाठी हे संक्रमण नातेसंबंधांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे आणि जवळीक वाढवण्याचे संकेत देत आहे.

कुंभ राशीच्या जातकांनो, गुरु तुमच्यासाठी आर्थिक बाबींच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ग्रह आहे, कारण तो द्वितीय आणि एकादश या दोन्ही भावांचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुमच्या आर्थिक निर्णयांवर जीवनसाथीचा प्रभाव वाढू शकतो. तसेच, विवाह, जीवनसाथी किंवा भागीदारीशी संबंधित बाबींवर अधिक खर्च होण्याची शक्यता आहे.

या राशीतील व्यावसायिक जातक आपल्या व्यावसायिक भागीदारीत गुंतवणूक वाढवू शकतात. एकादश भावाचा स्वामी म्हणून गुरुचा सप्तम भावातील प्रवेश असेही दर्शवतो की तुम्हाला सामाजिक वर्तुळातून विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात.

द्वितीय भावाचा स्वामी म्हणून गुरुचे हे संक्रमण असे संकेत देते की कुटुंबीय तुम्हाला विवाहासाठी प्रोत्साहित करू शकतात किंवा तुमचे वैवाहिक जीवन अधिक चांगले होण्यासाठी सहकार्य करू शकतात.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, आता गुरुच्या दृष्टीमुळे होणाऱ्या परिणामांविषयी जाणून घेऊया. गुरुची पाचवी दृष्टी एकादश भावावर पडल्यामुळे या काळात तुमचे सामाजिक वर्तुळ वाढू शकते आणि इच्छापूर्तीच्या संधी मिळू शकतात.

गुरुची सातवी दृष्टी लग्न भावावर पडल्यामुळे आरोग्य, व्यक्तिमत्त्व आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल होऊ शकतात. तसेच, गुरुची नववी दृष्टी तृतीय भावावर पडल्यामुळे लहान प्रवासांचे प्रमाण वाढू शकते आणि तुमचा आत्मविश्वास व संवादकौशल्य अधिक मजबूत होऊ शकते.

उपाय: दररोज किंवा गुरुवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करा.

Mangal Dosha

मीन राशी

मीन राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी गुरु लग्न भावाचा म्हणजेच स्वतःचे अस्तित्व आणि व्यक्तिमत्त्वाचा, तसेच दशम भावाचा म्हणजेच करिअर आणि व्यावसायिक जीवनाचा स्वामी आहे. आता ३१ ऑक्टोबर रोजी गुरु तुमच्या षष्ठ भावात प्रवेश करणार आहे. षष्ठ भाव रोग, कर्ज, स्पर्धा आणि शत्रूंशी संबंधित मानला जातो.

सिंह राशीतील गुरुचे हे संक्रमण केतूसोबत युती निर्माण करेल. केतू आधीपासूनच शत्रूंवर आणि स्पर्धात्मक परिस्थितींवर मात करण्यास मदत करत होता. मात्र, आता लग्नेश गुरुचा षष्ठ भावातील प्रवेश असे संकेत देतो की काही परिस्थितींमध्ये तुमची घाई किंवा चुकीचे निर्णयही आव्हानांना कारणीभूत ठरू शकतात.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, हा काळ स्पर्धा आणि विरोधाच्या परिस्थितींमध्ये वाढ होण्याचे संकेत देत आहे. तुम्ही एखाद्या कायदेशीर प्रकरणात किंवा न्यायालयीन खटल्यात अडकलेले असाल, तर अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असेल.

मात्र, तुम्ही बराच काळ एखाद्या आरोग्याच्या समस्येने त्रस्त असाल आणि त्यामागील कारण स्पष्ट होत नसेल, तर या संक्रमणामुळे आजाराचे निदान होण्यास आणि योग्य उपचार मिळण्यास मदत होऊ शकते.

कर्ज घेण्यासाठी किंवा अनावश्यक आर्थिक बोजा वाढवण्यासाठी हा काळ फारसा अनुकूल मानला जात नाही. परिस्थितीमुळे कर्ज घेणे आवश्यक ठरल्यास क्रेडिट कार्डचा वापर आणि आर्थिक निर्णय घेताना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.

गुरु तुमच्या दशम भावाचाही स्वामी असल्यामुळे हे संक्रमण करिअरच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम देऊ शकते. विशेषतः शिक्षण, बँकिंग, सेवा क्षेत्र, खाद्य उद्योग किंवा लक्झरी सेवा क्षेत्राशी संबंधित जातकांना याचा लाभ मिळू शकतो.

व्यवसाय करणाऱ्या जातकांनी या काळात व्यावसायिक भागीदारांसोबत वाद निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

सिंह राशीत गुरुचे संक्रमण नुसार, आरोग्याच्या दृष्टीने हा काळ फॅटी लिव्हर, शरीराच्या खालच्या भागात द्रव साचणे किंवा कर्जामुळे निर्माण होणारा तणाव यांकडे लक्ष देण्याचे संकेत देऊ शकतो. त्यामुळे दैनंदिन दिनचर्येकडे योग्य लक्ष दिल्यास फायदा होऊ शकतो.

आता गुरुच्या दृष्टीमुळे होणाऱ्या परिणामांविषयी जाणून घेऊया. गुरुची पाचवी दृष्टी दशम भावावर पडल्यामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात.

गुरुची सातवी दृष्टी द्वादश भावावर पडल्यामुळे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, गुरुची नववी दृष्टी द्वितीय भावावर पडल्यामुळे धन, बचत आणि बँकेतील शिल्लक यांना स्थैर्य आणि सुरक्षितता मिळू शकते.

उपाय: गुरुवारी गायीला हरभरा डाळ आणि गूळ खाऊ घाला.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. रिद्धी सिद्धीसोबत जोडलेले राहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार!

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१) प्रश्न: गुरुचे सिंह राशीतील संक्रमण कधी होणार आहे?

उत्तर:- गुरु ग्रह ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहेत.

२) प्रश्न: सिंह राशीचा स्वामी कोणता ग्रह आहे?

उत्तर:- वैदिक ज्योतिषानुसार, सूर्य हा सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे.

३) प्रश्न: गुरु ग्रह कोणत्या राशींचे स्वामी आहेत?

उत्तर:- वैदिक ज्योतिषात गुरु ग्रह धनु आणि मीन या दोन राशींचे स्वामी मानले जातात.

४) प्रश्न: गुरुचे सिंह राशीतील संक्रमण किती काळ प्रभावी राहील?

उत्तर:- गुरु ग्रह साधारणपणे एका राशीत सुमारे एक वर्ष वास्तव्य करतात. त्यामुळे सिंह राशीतील त्यांचे संक्रमण पुढील राशीत प्रवेश करेपर्यंत प्रभावी राहील.

५) प्रश्न: गुरुच्या सिंह राशीतील संक्रमणाचा कोणत्या जीवनक्षेत्रांवर परिणाम होऊ शकतो?

उत्तर:- गुरुच्या या संक्रमणाचा करिअर, आर्थिक स्थिती, शिक्षण, विवाह, नातेसंबंध आणि आध्यात्मिक जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या संक्रमणाचे परिणाम प्रत्येक राशीसाठी वेगवेगळे असू शकतात.

ज्या व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात उर्जा हवी आहे त्याच्यासोबत शेअर करा!

लेखकाचा परिचय:

नितीन शर्मा (गुरुजी) हे Ridhhi Sidhhi Astrology Solutions चे संस्थापक आणि ज्योतिष मार्गदर्शक आहेत. आजोबांकडून वडिलांकडे आणि वडिलांकडून त्यांच्यापर्यंत लाभलेला ज्योतिषशास्त्राचा पिढीजात वारसा त्यांनी औपचारिक शिक्षण व पारंपरिक ग्रंथांच्या अभ्यासाने अधिक समृद्ध केला आहे. ICAS मधून ज्योतिष प्रवीणा, ज्योतिष विशारद आणि ज्योतिष भूषण या तीन पदव्या प्राप्त केलेले गुरुजी वैदिक ज्योतिष, कुंडली विश्लेषण, राशीभविष्य आणि ग्रहगोचर यांसह विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन व मार्गदर्शन करतात. पारंपरिक ज्ञान सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे ध्येय आहे.

मार्गदर्शन:

रोज अश्याच नव नवीन माहिती मिळवण्यासाठी

WhatsApp Group Join करा

गुरुजींशी बोला

वैयक्तिक कुंडली सल्ला

जन्मकुंडली, विवाह जुळणी व ग्रहदोष निवारणासाठी वेळ ठरवा.

संबंधित लेख

श्रेणी

सल्ल्यासाठी माहिती पाठवा

अधिक अचूक विश्लेषणासाठी पूर्ण नाव, जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्मस्थळ द्या.

सेवा *
सल्ला कसा हवा? *

पत्ता

Ridhhi Sidhhi Astrology Solutions

१०-ब, स्टेट बँक कॉलोनी,
जय अंबे टायर समोर,
देवपूर, धुळे – ४२४००२

आपल्या प्रश्नांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन देण्यासाठी Ridhhi Sidhhi Astrology Solutions सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहे.

error: Content is protected !!