सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ · शके १९४८तिथी: अष्टमी सकाळी १०.५२ नंतर नवमीनक्षत्र: उत्तराषाढा दुपारी ३.३८ नंतर श्रवणयोग: घृती दुपारी १२:३४ नंतर शूलराहूकाळ: सकाळी ०७:५२ - ०९:१७सूर्योदय / सूर्यास्त: ०६:३१ – ०५:४५संपूर्ण पंचांग

Astrology Basics in Marathi: 16 ज्योतिषशास्त्राची प्राथमिक ओळख: ग्रह, राशी, भाव आणि कुंडलीची मूलभूत माहिती; संपूर्ण मार्गदर्शक

Astrology Basics in Marathi

ज्योतिष म्हणजे आकाशात दिसणारे तेज, याचे ज्ञान म्हणजे ज्योतिषज्ञान आणि ज्योतिषज्ञान करून देणारे शास्त्र म्हणजेच ज्योतिषशास्त्र होय. याच “ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती” Astrology Basics in Marathi थोडक्यात, आकाशातील ग्रह, नक्षत्र, तारकासमूह यांचे ज्ञान करून देणारे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र म्हणावे लागेल.

अंधारमय जीवनात ज्योतीसम प्रकाश दाखविणारे साधन म्हणजे ज्योतिषशास्त्र Vedic Knowledge होय. ज्योतिषशास्त्र हे वेदाचे दीप्तिमान नेत्रच आहे. ज्योतिषशास्त्र हे फार प्राचीन व देवादिकांपासून चालत आलेले, वेदामध्ये ज्याचा उल्लेख मिळतो असे अनादी श्रेष्ठ शास्त्रच आहे. पृथ्वीवरील हे एकच असे शास्त्र आहे की जे मानवाचे भविष्य सांगू शकते आणि हे भविष्य आपण व्यक्तींच्या जन्मकुंडलीवरून सांगतो.

सविस्तर माहिती येथे पहा

ज्योतिष म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्र हे जन्मवेळी ग्रह, राशी, नक्षत्र आणि कुंडलीतील भाव यांच्या आधारे व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलूंचा अभ्यास करणारे पारंपरिक शास्त्र आहे. यात ग्रह, राशी, नक्षत्र, भाव, भावेश, दृष्टी आणि योग यांचा एकत्रित विचार केला जातो.

जन्मदिवशी, जन्मवेळी, जन्मस्थळी आकाशातील ग्रह व तारकासमूह राशी यांची स्थिती दर्शविणारी आकृती किंवा नकाशा म्हणजेच कुंडली होय. थोडक्यात, ज्योतिषशास्त्र म्हणजे कुंडलीतील स्थाने, ग्रह, राशी, नक्षत्र, चरण यांचा एकत्रित विचार होय. ज्योतिषशास्त्राची इमारत ही स्थाने, ग्रह, राशी, नक्षत्र या चार खांबांवर उभी आहे. आपण या प्रकरणात यांची थोडक्यात प्राथमिक माहिती करून घेणार आहोत.


स्थानविचार Astrology Basics in Marathi

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, जन्मकुंडलीचे समान बारा भाग केलेले असतात. त्यातील प्रत्येक भागाला स्थान / गृह / भाव असे म्हणतात. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने कुंडलीची स्थाने मोजली जातात.

प्रथमस्थान

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, प्रथमस्थानाला लग्नस्थान, तनुस्थान, शरीरस्थान असे म्हटले जाते. यां स्थानावरून व्यक्तीची शरीरसंपदा, आरोग्य, स्वरूप, यशापयश, चेहरा, व्यक्तिमत्त्व, धडाडी, व्यक्तीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, इत्यादींचा विचार केला जातो. या स्थानाचा शरीरातील कपाळ, डोके, चेहरा, केस यावर अंमल पडतो. हे एक पत्रिकेतील अत्यंत शुभ असे केंद्रस्थान आहे.

द्वितीयस्थान

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, द्वितीयस्थानाला धनस्थान, वाचास्थान व कुटुंबस्थान असे म्हटले जाते. या स्थानावरून स्वकष्टार्जित धन, उजवा डोळा, आवाज, बोलणे, कौटुंबिक सौख्य, कुटुंबवृद्धी, कौटुंबिक शाप व वरदान, घराण्याची स्थिती इत्यादींचा विचार केला जातो. या स्थानाचा शरीरातील मान, घसा, गळा, उजवा डोळा, दात यावर अंमल पडतो. हे एक पत्रिकेतील (मारकस्थान असल्याने) द्वितीय प्रतीचे अशुभ असे मारकस्थान आहे.

तृतीयस्थान

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, तृतीयस्थानला बंधुस्थान, पराक्रमस्थान, सहजस्थान असे म्हटले जाते. या स्थानावरून जवळचे प्रवास, लेखन, हस्ताक्षर, पाठीवरील भावंडे, पराक्रम, शेजारी, गूढ ज्योतिषशास्त्र, धाडस, कर्तृत्व इत्यादींचा विचार केला जातो. या स्थानाचा शरीरातील कंठ, हात, खांदे, उजवा कान, फुप्फुसे यावर अंमल पडतो. हे एक पत्रिकेतील द्वितीय प्रतीचे शुभ असे पराक्रम स्थान आहे.

चतुर्थस्थान

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, चतुर्थस्थानाला सुखस्थान, मातृस्थान असे म्हटले जाते. या स्थानावरून आई, गाडी, बंगला, घराजवळील परिसर, मानसिक सौख्य, आयुष्याचा उत्तरार्ध, घरातील दोष, प्रॉपर्टी, शेती, प्राथमिक शिक्षण इत्यादींचा विचार केला जातो. या स्थानाचा शरीरातील छाती, वक्षस्थळ (स्तन) यावर अंमल पडतो. हे एक पत्रिकेतील प्रथम प्रतीचे शुभ असे केंद्रस्थान आहे.

पंचमस्थान

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, पंचमस्थानाला विद्यास्थान, संततिस्थान असे म्हटले जाते. या स्थानावरून शिक्षण, संतती, शैक्षणिक लाभ, प्रेमप्रकरण, रेस-लॉटरी जुगार इत्यादीमधून मिळणारा पैसा, उपासना, स्वप्ने, सर्वप्रकारच्या आकांक्षा इत्यादींचा विचार केला जातो. या स्थानाचा शरीरातील पाठ, हृदय, पाठीचा कणा यावर अंमल पडतो. हे एक पत्रिकेतील प्रथम प्रतीचे शुभ असे त्रिकोणस्थान आहे.

षष्ठस्थान

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, षष्ठस्थानाला शत्रुस्थान, रोगस्थान असे म्हटले जाते. या स्थानावरून नोकरी, मामा-मावशी, आजार (रोग), शत्रुत्व, वाईट संगत, व्यसन इत्यादींचा विचार केला जातो. या स्थानाचा शरीरातील पचनेंद्रिय, लहानमोठी आतडी यावर अंमल पडतो. हे एक पत्रिकेतील प्रथम प्रतीचे अशुभ असे त्रिकस्थान आहे.

सप्तमस्थान

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, सप्तमस्थानाला जायास्थान, विवाहस्थान असे म्हटले जाते. या स्थानावरून विवाह, भावी जोडीदार, वैवाहिक सौख्य, भागीदारी, कामभावना इत्यादीचा विचार केला जातो. या स्थानाचा शरीरातील गुह्येद्रियाचा बाहेरील भाग, गुह्येद्रियाची शक्ती, मूत्राशय, कंबर यावर अंमल पडतो. हे एक पत्रिकेतील द्वितीय प्रतीचे अशुभ असे मारकस्थान व केंद्रस्थान आहे.

अष्टमस्थान

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, अष्टमस्थानाला मृत्युस्थान असे म्हटले जाते. या स्थानावरून मृत्यू, मृत्युपत्राद्वारे होणारे लाभ (पैसा), अपघात, अचानक धनलाभ, लाचलुचपत, वैवाहिक सौख्याची मर्यादा इत्यादींचा विचार केला जातो. या स्थानाचा शरीरातील शुक्राशय, स्त्रीबीज, पूंबीज, उत्पादक ग्रंथी, गुदद्वार यावर अंमल पडतो. हे एक पत्रिकेतील प्रथम प्रतीचे अशुभअसे त्रिकस्थान आहे.

नवमस्थान

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, नवमस्थानाला भाग्यस्थान, धर्मस्थान असे म्हटले जाते. या स्थानावरून व्यक्तीचे भाग्य, नशीब, लांबचे प्रवास, सर्व प्रकारच्या संधी, गुरू, अध्यात्म, सद्गुण, उच्चशिक्षण इत्यादींचा विचार केला जातो. या स्थानाचा शरीरातील मांड्या यावर अंमल पडतो. हे एक पत्रिकेतील प्रथम प्रतीचे शुभ असे त्रिकोणस्थान आहे.

दशमस्थान

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, दशमस्थानाला कर्मस्थान असे म्हटले जाते. या स्थानांवरून व्यक्तींचे कर्म, पत, पद, अधिकार, पुरस्कार, यश, कीर्ती, व्यवसाय, वडील, इत्यादींचा विचार केला जातो. या स्थानाचा शरीरातील गुडघे यावर अंमल पडतो. हे एक पत्रिकेतील प्रथम प्रतीचे शुभ असे केंद्रस्थान आहे.

एकादशस्थान

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, एकादशस्थानाला लाभस्थान असे म्हटले जाते. या स्थानावरून सर्व प्रकारचे लाभ, इच्छापूर्ती, मित्रसुख, वडिलोपार्जित धन, मोठी भावंडे, स्वकष्टार्जित धन, सुना जावयांचे सुख इत्यादींचा विचार केला जातो. या स्थानाचा शरीरातील डावा कान, गुडघ्यापासून पायापर्यंतचा भाग (पोटऱ्या) यावर अंमल पडतो. हे एक पत्रिकेतील द्वितीय प्रतीचे शुभअसे पराक्रमस्थान आहे.

द्वादशस्थान

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, द्वादशस्थानाला व्ययस्थान, शय्यासुखस्थान असे म्हटले जाते. या स्थानावरून लैंगिक सुख, हॉस्पिटल, तुरुंगवास, परदेशगमन, खर्च, कर्ज, सर्व गोष्टींचा व्यय, आत्महत्या, चिंता, गुप्तता, फौजदारी, जोडीदाराचे आजार, मोक्ष, संन्यास, स्थानत्याग, इत्यादींचा विचार केला जातो. या स्थानाचा शरीरातील तळपाय, घोटा व डावा डोळा यावर अंमल पडतो. हे एक पत्रिकेतील प्रथम प्रतीचे अशुभ असे त्रिकस्थान आहे.

स्थानाविषयी स्थूल माहिती पाहिल्यावर आता आपण कुंडलीतील प्रत्येक स्थानावरून नातेवाइकांचा विचार करणार आहोत. कारण विवाह म्हणजे पतिपत्नीचा मेल नसून सर्व नातेवाइकांचा, समाजाचा मेल असतो. वैवाहिक सौख्याची पूर्तता कुटुंबातील सर्व घटकांवर अवलंबून असते. यासाठी आपण कुटुंबातील नातेवाइकांचा विचार कोणत्या स्थानावरून करायचा हे खालील आकृतीवरून पाहणार आहोत.


ग्रह विचार

एकूण बारा ग्रहांचा ज्योतिषशास्त्रात विचार केला जातो. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, विवाहाच्या दृष्टीने आता आपण थोडक्यात या ग्रहांचे स्वरूप, स्वभाव, कारकत्व, शुभ-अशुभत्व इ. पाहणार आहोत.

१) सूर्य

  • ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, सर्व ग्रहांचा राजा असलेला प्रमुख ग्रह सूर्य हा क्षत्रिय वर्णाचा, पुरुष व सात्त्विक असा एक सौम्य पापग्रह आहे.
  • स्वरूप : सूर्य हा दिसावयास तांबूस किंवा गौरवर्णीय, सडसडीत व सुदृढ बांध्याचा, उंच, पिंगट केस असलेला, देखणा अशा स्वरूपाचा आहे.
  • स्वभाव : सूर्य हा अतिशय स्वाभिमानी, गर्विष्ठ, करारी, महत्त्वाकांक्षी, रागीट, स्वतःचेच खरे करणारा, नेतृत्व करणारा, अधिकार गाजविणारा मात्र सद्‌गुणी, उदार, परोपकारी, वक्तशीर, शिस्तप्रिय अशा स्वभावाचा आहे.
  • कारकत्व : रविवरून नोकरी, सरकार, आत्मा, वडील, पती, सर्वोत्तम सद्गुण, आरोग्य, जीवनविषयक दृष्टिकोन, धडाडी, प्रतिष्ठा, कर्तृत्व, राजकारण, अधिकार, उच्चपद, कीर्ती इ. गोष्टींचा विचार केला जातो.
  • शरीराचे भाग : आत्मा, हृदय, पाठीचा कणा, डोळे, गळा, मेंदू.
  • शाखा : सरकारी नोकरदार, राजकारणी, सायन्स, संरक्षण क्षेत्र, डॉक्टर, औषध निर्माते.

२) चंद्र

  • चंद्र : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, सर्व ग्रहांमध्ये अत्यंत चंचल, गतिमान, संवेदनशील असा चंद्र सत्त्वगुणी, स्त्रीलिंगी व जलतत्त्वाचा असा एक शुभग्रह आहे.
  • स्वरूप : चंद्र हा दिसावयास अतिशय सुंदर, देखणा, गोल चेहऱ्याचा,
  • गोरा, मध्यम उंचीचा व मध्यम प्रमाणबद्ध बांध्याचा असा आहे. स्वभाव : चंद्र हा गुणवान, भोगी, विलासी, चंचल, प्रेमळ, मातृभक्त, संवेदनशील, कुटुंबवत्सल, शांत, प्रवासी, सात्त्विक, गोड बोलणारा, समजूतदार, कोमल हृदयाचा अशा स्वभावाचा आहे.
  • कारकत्व : चंद्रावरून मन, आई, पत्निसुख, घर, जल, ज्योतिषविद्या, वाहतूक, प्रवास इ. गोष्टींचा विचार केला जातो.
  • शरीराचे भाग : पोट, छाती, शरीरातील रसरक्त व पाणी, पचनक्रिया,
  • गर्भाशय, मूत्र इ.
  • शाखा : नेव्ही, नाविक, पाटबंधारे खाते, दुग्धव्यवसाय, दुकाने, रॉकेल, पेट्रोल, बागायती शेती.

Marriage Yoga
Marriage Yoga

३) मंगळ

  • मंगळ : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, सर्व प्राणिमात्रांचे संरक्षण करण्यास गरजेचा असणारा मंगळ हा पुरुषग्रह, क्षत्रिय वर्णाचा, तमोगुणी असा अतिपापग्रह आहे.
  • स्वरूप : हा दिसावयास उग्र, तांबूस गौरवर्णाचा, उंच, धिप्पाड, बळकट बांध्याचा, करारी नजर असलेला, अल्प केस व क्रूर दृष्टी असलेला असा आहे.
  • स्वभाव : मंगळ हा तापट, हट्टी, भांडखोर, चंचल, उतावीळ, उच्चाधिकाराची महत्त्वाकांक्षा असणारा, धाडसी, शूर, अभिमानी, विलासी, कामप्रधान, आपलेच खरे करणारा अशा स्वभावाचा आहे.
  • कारकत्व : मंगळावरून बंधुसुख, सामर्थ्य, व्यक्तीची शक्ती, कामेच्छा, झुंज, अधिकाराची महत्त्वाकांक्षा, स्वातंत्र्य, अपघात, भूमी, पुरुषार्थ, शस्त्र, क्रोध, रजोदर्शन, युद्ध, भांडणे, स्फोट इ. विचार केला जातो. शरीराचे भाग : चेहरा, डोके, मेंदू, रक्त, मूत्राशय, स्नायू, जननेंद्रिये, गर्भाशय, गुदद्वार, किडनी, प्रोस्टेट ग्रंथी.
  • शाखा : इंजिनियरिंग, तंत्रशास्त्र, रसायनशास्त्र, शस्त्रक्रिया, डॉक्टर, गणितशास्त्र इ.

४) बुध

  • बुध : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, बुद्धीचा कारक असलेला बुध हा ग्रह नपुंसक, रजोगुणी, क्षुद्र वर्णाचा, अनुकरणप्रिय असा शुभ ग्रह आहे.
  • स्वरूप : बुध हा दिसावयास आहे त्या वयापेक्षा तरुण, लहान वाटणारा, नाजूक शरीराचा, मध्यम उंचीचा, काळसर किंवा सावळ्या वर्णाचा, कृश शरीराचा, बालिश, मात्र देखणा, स्मार्ट असा ग्रह आहे. स्वभाव : बुध हा बोलका, विनोदी, बुद्धीमान, हजरजबाबी, व्यवहारचतुर, हिशोबी, विद्वान अशा स्वभावाचा आहे.
  • कारकत्व : बुधावरून वाणी, वक्तृत्व, लेखन, मामा, मावशी, बुद्धी, तर्कशक्ती, गणित, त्वचा, गूढ ज्योतिषशास्त्र इ. विचार केला जातो.
  • शरीराचे भाग : मज्जातंतू, मेंदू, कान, फुप्फुसे, पचनसंस्था, पोट, त्वचा.
  • शाखा : अकाउंट, गणित, कॉमर्स, वक्ता, शिकवणी घेणारा शिक्षक, लेखक, पत्रकार, दलाली, कमिशन एजंट.

५) गुरू

  • गुरू : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, सर्व ग्रहांत आकारमानाने मोठा असणारा व सर्वांत शुभअसणारा असा गुरू पुरुष, ब्राह्मण वर्णाचा, सत्त्वगुणी ग्रह आहे.
  • स्वरूप : गुरू हा दिसावयास गौरवर्णी, काळसर पिंगट केस व डोळे असलेला, पोट व शरीर मोठे (स्थूल) असलेला, मध्यम किंवा कमी उंचीचा असा ग्रह आहे.
  • स्वभाव : गुरू हा शांत, सर्वगुणसंपन्न, सद्‌गुणी, सात्त्विक, क्षमाशील,
  • तत्त्ववेत्ता, न्यायी, दयाळू, धार्मिक, सात्त्विक अशा स्वभावाचा आहे.
  • कारकत्व : गुरु वरुन विद्या, ज्ञान, मंत्रीपद, पैसा, शुभ कार्य, संतती, अध्यात्म विद्या, कीर्ती, प्रतिष्ठा, पुरस्कार इ. विचार केला जातो.
  • शरीराचे भाग : मांड्या, तळपाय, यकृत, उजवा कान, शरीरातील चरबी, स्वादुपिंड.
    शाखा : शिक्षक, मंत्री, आमदार, खासदार, संस्थापक, सायन्स,पौरोहित्य.

६) शुक्र

  • शुक्र : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, गुरूप्रमाणे अतिशय शुभ असणारा शुक्र हा स्त्रीग्रह, ब्राह्मण वर्णाचा, जलतत्त्वाचा व रजोगुणी असा आहे.
  • स्वरुप : शुक्र हा दिसावयास सावळा, काळे व कुरळे केस असलेला, मध्यम उंचीचा, सुंदर, आकर्षक, मध्यम व रेखीव बांधा असणारा, सुंदर कपडे घालणारा, सौम्यदृष्टीचा असा ग्रह आहे.
  • स्वभाव : शुक्र हा रसिक, विलासी, आनंदी, विषयवासनेने युक्त, विद्वान, कलाप्रिय, सौंदर्यप्रिय, हौशी, रंगेल अशा स्वभावाचा ग्रह आहे.
  • कारकत्व : शुक्रावरून विवाह, लैगिंकसुख, चारित्र्य, भोगलालसा, चित्रपट, अभिनय, कला, संगीत, सौंदर्य, प्रेम, शृंगार, वैवाहिक सौख्य, पत्नी, वस्त्र, अलंकार, पैसा, ऐश्वर्य, वाहने इ. विचार केला जातो.
  • शरीराचे भाग : चेहरा, नाक, डोळे, घसा, लिंग, शुक्रजंतू, मूत्रपिंड, गर्भाशय.
  • शाखा : आर्टस्, कलेचे शिक्षण, ब्यूटीपार्लर, फॅशन डिझाईनर, पेंटर, अभिनेते, गायक इ.

७) शनि

  • शनि : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, सर्व ग्रहांमध्ये अतिपापग्रह असलेला शनि हा नपुंसक, तमोगुणी, क्षुद्र वर्णाचा, वायुतत्त्वाचा असा ग्रह आहे.
  • स्वरूप : शनि हा दिसावयास सावळ्या वर्णाचा किंवा काळ्या वर्णाचा, केस व अवयव लांबट असणारा, कृश व रुक्ष शरीर असणारा, दात मोठे, मलिन वस्त्रे घालणारा, कमी उंचीचा, विजोड, वयाने मोठा दिसणारा, सर्वसामान्य व्यक्तिमत्त्वाचा असा ग्रह आहे.
  • स्वभाव : शनि हा तामसी, आळशी, अबोल, कष्टाळू, प्रामाणिक, शांत, सहनशील, काटकसरी, मंदपणे काम करणारा असा ग्रह आहे.
  • कारकत्व : शनिवरून दुःख, दारिद्र्य, यातना, संकटे, प्रतिकूल परिस्थिती, काळ्या वस्तू, लोखंड, तेल, खनिज पदार्थ, कोळसा, नोकरी, मृत्यू, विलंब, दीर्घआजार, ज्योतिष, विनाश, निराशा इत्यादींचा विचार केला जातो.
  • शरीराचे भाग : हाडे, त्वचा, दात, गुडघे, डावा कान, सांधे इ.
  • शाखा : बांधकाम व्यवसाय, तेल-कोळसा लोखंड-भंगार इ. खरेदी-विक्री, ज्योतिष, कॉमर्स, वकिली, अकाऊंट इ.

८) राहु

  • राहु : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, विषारी सर्पाचे तोंड म्हणजे राहु छायाग्रह असलेला हा विषारी ग्रह अतिपापग्रह आहे.
  • स्वरूप : राहु हा दिसावयास सावळा, सडपातळ, कमी उंचीचा, कुरूप, वृद्ध असा ग्रह आहे.
  • स्वभाव : राहु हा पापकर्मी, पापवासनेचा, नीच स्वभावी, भांडखोर, व्याधीग्रस्त, नेहमी दुसऱ्याची निंदा करणारा अशा स्वभावाचा ग्रह आहे.
  • कारकत्व : राहुवरून विषारी पदार्थ, विषारी प्राणी, गारुडी विद्या,
  • हलक्या दर्जाची कामे, हलकी जात किंवा परजातीय, पितृदोष, कुलक्षय, वास्तुदोष इ.चा विचार केला जातो.
  • शरीराचे भाग : राहु ज्या राशीत असेल त्या राशीच्या स्वामीचा शरीरावर जो प्रभाव असतो त्याप्रमाणे राहचे नियंत्रण असते.
  • शाखा : ज्योतिष, पोलीस, मंत्रतंत्रविद्या, वशीकरण, मात्रिक इ.

९) केतु

  • केतु : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, विषारी सापाची शेपटी म्हणजे केतु होय. हाही एक छाया ग्रह असलेला अतिपापग्रह आहे.
  • स्वरूप : केतु हा दिसावयास सावळा, उंच, सडपातळ, क्रूर चेहरा असलेला ग्रह आहे.
  • स्वभाव : केतु हा भांडखोर, क्रूरकर्मी, तापट, आक्रमक अशा स्वभावाचा ग्रह आहे.
  • कारकत्व : केतुवरून धार्मिक संस्था, आध्यात्मिक कार्य, आश्रम, वैराग्य, संन्यास, त्याग, मोक्ष, संततिविरोधक इ. विचार केला जातो.
  • शरीराचे भाग : मणक्याचा खालचा भाग, अध्यात्म मंत्रसिद्धीसाठीचा वापरणारा भाग.
  • शाखा : संन्यासी, साधू, संत, ज्योतिष, तंत्र मंत्रविद्या, मांत्रिक.

१०) हर्षल

  • हर्षल : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, हर्षल हा प्रचंड शक्ती असलेला पुरुष ग्रह आहे. मंगळाप्रमाणे सर्वसाधारण फळे देणारा हा ग्रह एक अतिपापग्रह आहे.
  • स्वरूप : हर्षल हा दिसावयास गोरा, उंच, सुदृढ बांध्याचा, आकर्षक असा ग्रह आहे.
  • स्वभाव : हर्षल हा अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा, विक्षिप्त, लहरी, हेकट, तापट, विलासी अशा स्वभावाचा ग्रह आहे.
  • कारक : हर्षल वरून तंत्रक्षेत्र, ज्योतिष, स्थिरता, विक्षिप्तता, अनपेक्षितता, आकस्मितता, अनिश्चितता, तिरसटपणा इत्यादींचा विचार केला जातो.

११) नेपच्यून

  • नेपच्यून : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, नेपच्यून हा शुक्राप्रमाणे फळ देणारा एक स्त्रीग्रह व शुभग्रह आहे. नेपच्यूनचा संबंध डोक्यापेक्षा हृदयाशी जास्त असतो.
  • स्वरूप : नेपच्यून हा दिसावयास सावळा, सुंदर, आकर्षक, मध्यम उंचीचा, मध्यम किंवा स्थूल बांध्याचा असा ग्रह आहे.
  • स्वभाव : नेपच्यून हा अत्यंत कोमल अंतःकरणाचा, भावनाशील, संवेदनशील, प्रेमळ, रसिक, विलासी, बुद्धिमान, गूढस्वभावी असा ग्रह आहे.
  • कारकत्व : नेपच्यून गूढज्योतिष, अतिंद्रिय, मादक पदार्थ, व्यसन, आकस्मित धनलाभ, अंतःस्फूर्ती, सूचक स्वप्ने, अध्यात्म, मंत्रतंत्र इ. विचार केला.
  • शाखा : कला, ज्योतिष, संशोधन, मांत्रिक, जादूगार, मानसोपचारतज्ज्ञ, अभिनय, दारू इ.

१२) प्लुटो

  • प्लुटो : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, मंगळाच्या कारकत्वाप्रमाणे निगडित असलेला हा ग्रह अतिशय विध्वंसक असा पुरुष व अतिपापग्रह आहे.
  • कारकत्व : प्लुटोवरून जनसमुदाय, जनहितार्थ कार्य, मोठ्या प्रमाणावर लाभ अथवा हानी, अचानक मोठे अपघात, दंगल, बॉम्बस्फोट, विश्वासघात, आतंकवाद, विचित्र लैंगिक पाशवी वृत्ती, इत्यादींचा विचार केला जातो.

राशी विचार

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, स्थानांचा व ग्रहांचा प्राथमिक अभ्यास केल्यानंतर राशींचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे असते. ग्रहांची स्थानगत फळे राशी-अभ्यासाशिवाय निरर्थक होतात. ग्रहांचे प्रत्येक राशीतले परिणाम त्या राशीच्या गुणधर्मावर, स्वभावावर अवलंबून असतात. भावेशाचा विचारही आपण स्थानामध्ये असणाऱ्या राशीच्या अंकावरून करतो.

एकूण बारा राशी आहेत- मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.

आता आपण प्रत्येक राशीच्या व्यक्तीचे वर्णन, स्वभाव पाहू. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, विवाह विषयामध्ये जोडीदाराचे वर्णन राशीवरून करतात.

१) मेष रास

  • मेष राशी : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, प्रथम क्रमांकाच्या मेष राशीचा स्वामी मंगळ असून ही राशी अग्नितत्त्वाची, पुरुषलिंगी, पूर्व दिशादर्शक, चर स्वभावी, क्षत्रिय वर्णाची, तमोगुणी अशी आहे.
  • स्वरूप : उंच कपाळ, मोठे डोळे, करारी नजर, सदृढ बांधा किंवा कृश, उंच, हाडे मजबूत व उठावदार, डोके लांबट, चेहरा उभा किंवा त्रिकोणी, गालाची हाडे वर आलेली, तांबूस गौरवर्ण म्हणजे मेष व्यक्ती.
  • स्वभाव : मेष राशीच्या व्यक्ती चंचल, हट्टी, भांडखोर, शीघ्र कोपी, धाडसी, उतावीळ, चंचल, सतत विचार बदलणाऱ्या, आरंभशूर, गतिमान, धरसोड वृत्ती, आक्रमक, हुकूमशाही वृत्तीच्या मात्र तेवढ्याच प्रामाणिक, विश्वासू, तडफदार, स्पष्टवक्त्या, मोठ्या मनाच्या, श्रम व कष्ट करणाऱ्या अशा स्वभावाच्या असतात.
  • शाखा : विस्तवाशी व अग्नीशी संबंधित कामे, तंत्रशिक्षण, इंजिनिअर, पोलीस, मिलिटरी, संरक्षण खात्ते, रसायनशास्त्र, डॉक्टर इ.

२) वृषभ रास

  • वृषभ राशी : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, द्वितीय क्रमांकाच्या वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून ही राशी पृथ्वीतत्त्वाची, स्त्रीलिंगी, दक्षिण दिशादर्शक, स्थिर स्वभावी, वैश्य वर्णाची व रजोगुणी अशी आहे.
  • स्वरूप : मध्यम उंची, मध्यम किंवा स्थूल बांधा, आकर्षक मादक शरीर, गौरवर्ण, सुंदर, देखणी, कपाळ व डोके चौरस, गोल चेहरा, मान लहान, डोळे सफेद, मोहक व पाणीदार म्हणजे वृषभ व्यक्ती.
  • स्वभाव : वृषभ राशीच्या व्यक्ती भोगी, कलाप्रिय, सौंदर्यप्रिय, रसिक, विलासी, अलंकार व नटण्याची आवड असणाऱ्या, स्वार्थी, शांत, स्थिर, विचारी, आळशी मात्र चैनी, मौजमजा करणाऱ्या अशा स्वभावाच्या असतात.
  • शाखा : अभिनय, गायन-वादन, नृत्य, कला, डॉक्टर, नर्स, व्यापारी.

३) मिथुन रास

  • मिथुन राशी : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, तृतीय क्रमांकाच्या मिथुन राशीचा स्वामी बुध असून ही राशी वायुतत्त्वाची, स्त्री किंवा नपुंसक, पश्चिम दिशादर्शक, द्विस्वभावी, शुद्र वर्णाची व रजोगुणी अशी आहे.
  • स्वरूप : उंच, मध्यम बांधा, उभट चेहरा, सावळा वर्ण, स्मार्ट, आहे त्या वयापेक्षा तरुण वाटणारी, आपल्यापेक्षा लहान व्यक्तीशी संबंधित, हसऱ्या चेहऱ्याची, नाक सुरेख, चेहरा मोहक, आकर्षक, अवयव लांबट, असणारी म्हणजे मिथुन व्यक्ती.
  • स्वभाव : मिथुन राशीच्या व्यक्ती बोलक्या, विनोदी, मनाचा थांगपत्ता लागू न देणाऱ्या, हसतमुख, दुटप्पी, बुद्धीमान, उत्तम सौंदर्यवृत्ती, व्यवहारचतुर, हिशोबी, संधिसाधू, हजरजबाबी अशा स्वभावाच्या असतात.
  • संबंध : जिथे बोलण्याचा, अंकशास्त्राचा व सल्लामसलतीचा संबंध येतो तिथे या राशीचे लोक अग्रेसर असतात.
  • शाखा : सी.ए., कॉमर्स, अकाउंट, कन्सलटंट, दलाली, कमिशन एजंट, व्यापारी, वकिली, वक्ता.

४) कर्क रास

  • कर्क राशी : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, चतुर्थ क्रमांकाच्या कर्क राशीचा स्वामी चंद्र असून ही राशी जलतत्त्वाची, स्त्रीलिंगी, उत्तर दिशादर्शक, चर स्वभावी, ब्राह्मण वर्णाची, सात्त्विक अशी आहे.
  • स्वरूप : मध्यम उंची, मध्यम बांधा, गोल चेहरा, कपाळ गोल व विशाल, हनुवटी निमुळती होत गेलेली, बारीक नाक, गाल फुगीर व पुष्ट, डोळे जरा मोठे व स्वप्नाळू, गौरवर्ण, नाजूक, सुंदर, देखणी म्हणजे कर्क व्यक्ती.
  • स्वभाव : कर्क राशीच्या व्यक्ती कुटुंबवत्सल, भोळ्या, निरागस, चंचल, संवेदनशील, भावनाप्रधान, हळव्या मनाच्या, प्रेमळ, भित्री, अस्थिर, मोकळ्या मनाच्या, लोकप्रिय, आनंदी मात्र थोड्या चैनी, विलासी, प्रवासी, मातृभक्त, संततीवर प्रेम करणाऱ्या, सदाचारी, सात्त्विक, दुसऱ्यासाठी कष्ट करणाऱ्या अशा स्वभावाच्या असतात.
  • संबंध : जल, बागबगीचा, प्रवास, स्वयंपाकघर.
  • शाखा : मानसोपचारतज्ज्ञ, द्रवपदार्थांचा व्यापार, वाहतूक, ट्रान्सपोर्ट, टुरिझम, दूध व्यवसाय इ.

Marriage Gunamilan
Marriage Gunamilan

५) सिंह रास

  • सिंह राशी : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, पाचव्या क्रमांकाच्या सिंह राशीचा स्वामी रवि असून ही राशी अग्नितत्त्वाची पुरुष, पूर्व दिशादर्शक, स्थिर स्वभावी, क्षत्रिय वर्णाची, सात्त्विक अशी आहे.
  • स्वरूप : बांधा उंच व सरळ, प्रमाणशील रेखीव शरीर, भारदस्त छाती, भव्य कपाळ, कंबर लहान, चेहरा चौरस, मान ताठ, तांबूस-गौरवर्ण, सुदृढ बांधा म्हणजे सिंह व्यक्ती.
  • स्वभाव : सिंह राशीच्या व्यक्ती, करारी, मानी, महत्त्वाकांक्षी, स्वतःला विशेष समजणाऱ्या, माघार न घेणाऱ्या, हुकूमशाही वृत्तीच्या, नेतृत्व करणाऱ्या, अधिकारलालसा असणाऱ्या, शिस्तप्रिय, वक्तशीर, प्रामाणिक, शूर, धाडसी, स्वातंत्र्यप्रिय, उदार, परोपकारी, निश्चयी, दीर्घोद्योगी, कष्टाळू, अहंकारी अशा स्वभावाच्या असतात.
  • संबंध : अंमलबजावणी, सरकारी अधिकारी (वरिष्ठ), राजकारणी
    शाखा : सरकारी वरिष्ठ नोकरदार, मंत्री, संरक्षण अधिकारी, पोलीस, मिलिटरी, स्पर्धा परीक्षा.

६) कन्या रास

  • कन्या राशी : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, सहाव्या क्रमांकाच्या कन्या राशीचा स्वामी बुध असून ही राशी पृथ्वीतत्वाची, स्त्री किंवा नपुंसक लिंगी, दक्षिण दिशादर्शक, द्विस्वभावी, वैश्य वर्णाची, राजस अशी आहे.
  • स्वरुप : मध्यम बांधा, मध्यम उंची, गौरवर्ण, अवयव शिथिल, भव्य कपाळ, डोके व चेहरा गोल, गाल फुगीर, नाक मोठे, सुंदर, चिरकाल तरुण दिसणारी म्हणजे कन्या व्यक्ती.
  • स्वभाव : कन्या राशीच्या व्यक्ती भित्र्या स्वभावाच्या, सतत काळजी करणाऱ्या, सतत डोक्याला हात लावून बसणाऱ्या, चिकित्सक वृत्ती, संशयी, द्विधा मनःस्थिती, संधिसाधू, आतल्या गाठीच्या मात्र नम्र, विनयशील, लाजाळू, प्रेमळ, संसारी, व्यवहारी, समजूतदार, संगोपनवृत्ती व संसाराची आसक्ती असणाऱ्या, कष्टाळू, शुद्ध आचरण व चारित्र्य असणाऱ्या अशा स्वभावाच्या असतात.
  • शाखा : कॉमर्स, शाखा, शिक्षक, व्यापार

७) तूळ रास

  • तूळ राशी : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, सातव्या क्रमांकाच्या तूळ राशीचा स्वामी शुक्र असून ही राशी वायुतत्त्वाची, पुरुष लिंगी, पश्चिम दिशादर्शक, चर स्वभावी, शूद्र वर्णाची व रजोगुणी अशी आहे.
  • स्वरूप : उंच, मध्यम किंवा कृश बांधा, लांबट अवयव, उंच मान, लांबट डोके, भव्य कपाळ, उभट चेहरा, उभट नाक, डोळे सुंदर, देखण्या व आकर्षक, सावळ्या वर्णाची म्हणजे तूळ व्यक्ती.
  • स्वभाव : तूळ राशीच्या व्यक्ती समजूतदार, प्रेमळ, हौशी, सौंदर्य उपासक, न्यायी, समतोल विचारी, नम्र, आनंदी, कलाकार, नटण्याची, छानछौकीपणाची आवड थोडी कमी, व्यावहारिक दृष्टिकोन कलाप्रिय, अशा स्वभावाच्या असतात.
  • शाखा : कलाकार, कला, न्यायाधीश, वकील.

८) वृश्चिक रास

  • वृश्चिक राशी : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, आठव्या क्रमांकाच्या वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असून ही राशी जलतत्त्वाची, स्त्रीलिंगी, उत्तर दिशादर्शक, स्थिर स्वभावी, ब्राह्मण वर्णाची व तमोगुणी अशी आहे.
  • स्वरूप : उत्तम व्यक्तिमत्त्व, सौंदर्यसंपन्न, आकर्षक, सुदृढ व मध्यम बांधा, मध्यम उंची, गौरवर्णी, तरतरीत नाक, अवयव जरा आखूड व रुंद, खांदे रुंद व छाती पुढे, भव्य कपाळ, त्रिकोणी चेहरा, डोळे
    भेदक-मोहक-विषारी म्हणजे वृश्चिक व्यक्ती.
  • स्वभाव : वृश्चिक राशीच्या व्यक्तीत टोचून बोलण्याची सवय असते. समोरील व्यक्तीचे कसे चुकीचे आहे व आपण कसे बरोबर आहोत हे पटवून देणाऱ्या व्यक्ती असतात. या राशीच्या व्यक्ती रागीट, हट्टी, मार्मिक, खोचक बोलणाऱ्या, कुढ्या, आतल्या गाठीच्या, थोड्या द्वेषी, मत्सरी, सूड उगवणाऱ्या, हेकेखोर, गुप्तता बाळगणाऱ्या मात्र निश्चयी, करारी, कष्टाळू, धाडसी, व्यवहारी, असंतुष्ट, असमाधानी व दुसऱ्याला लगेच माफ न करणाऱ्या असतात.
  • शाखा : टीकाकार, परखड पत्रकार, पोलीस अधिकारी, राजकीय व्यक्ती, सर्जन इ.

९) धनु रास

  • धनु राशी : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, नवव्या क्रमांकाच्या धनु राशीचा स्वामी गुरू असून ही राशी अग्नितत्त्वाची, पुरुष, पूर्व दिशादर्शक, द्विस्वभावी, क्षत्रिय वर्णाची व सत्त्वगुणी अशी आहे.
  • स्वरूप : उंच बांधा, पिळदार शरीर, देखणे व्यक्तिमत्त्व, भारदस्त छाती, मनगटे मोठी व जाड, भव्य कपाळ, डोके लहान, चेहरा रुंद-मादक-मोहक, नाकीडोळी सुरेख म्हणजे धनु व्यक्ती.
  • स्वभाव : धनु राशीच्या व्यक्ती मानी, नम्र, विनयशील, विवेकी, निश्चयी, शांत, महत्त्वाकांक्षी, गंभीर, व्यासंगी, धार्मिक, कष्टाळू, अन्यायाची चिड, न्यायी, तेजस्वी, कर्तृत्ववान, सदाचारी, साधी राहणी, दुटप्पी अशा स्वभावाच्या असतात.
  • शाखा : शिक्षक, प्राध्यापक, बँक अधिकारी, संस्थापक.

१०) मकर रास

  • मकर राशी : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, दहाव्या क्रमांकाच्या मकर राशीचा स्वामी शनि असून ही राशी पृथ्वीतत्त्वाची, स्त्री, दक्षिण दिशादर्शक, चर स्वभावी, वैश्य वर्णाची व तमोगुणी अशी आहे.
  • स्वरूप : मध्यम बांधा, उंची कमी, हाडे मजबूत, कपाळ बारीक, हनुवटी मगरीसारखी, ओठ जाड, त्वचा खरखरीत व जाड, काळा वर्ण, सर्वसामान्य रूप म्हणजे मकर व्यक्ती.
  • स्वभाव : मकर राशीच्या व्यक्ती शून्यातून, प्रतिकूल परिस्थितीतून जग निर्माण करणाऱ्या असतात, या श्रमिक, कष्टाळू, दीघोंद्योगी, चौकस, काटकसरी, व्यवहारी, उदास, सहनशील, मुद्देसुद बोलणाऱ्या, संतोषवृत्तीच्या, मोकळ्या मनाच्या, साधी राहणी व थोड्या अरसिक, धीम्या, शांत अशा स्वभावाच्या असतात.
  • शाखा : न्यायालये, जज्ज, वकील, मध्यस्थी करणारे, कन्सल्टींग, काळ्या वस्तूचा व्यापार, खनिज पदार्थ, राजकारण.

११) कुंभ रास

  • कुंभ राशी : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, अकराव्या क्रमांकाच्या कुंभ राशीचा स्वामी शनि असून ही राशी वायुतत्त्वाची, पुरुष, पश्चिम दिशादर्शक, स्थिरस्वभावी, शूद्र वर्णाची व तमोगुणी अशी आहे.
  • स्वरूप : बांधा प्रमाणाबाहेर उंच, अवयव लांब, उंच मान, कपाळ व डोके मोठे, नाक लांबलचक व सुरेख, देखणे आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या, सावळ्या म्हणजे कुंभ व्यक्ती.
  • स्वभाव : कुंभ राशीच्या व्यक्ती बुद्धिमान, विद्वान, गंभीर, उदास, ज्ञानपिपासू, संशोधक, मितभाषी, कष्टाळू, निश्चयी, व्यवहारी, कंजूष, स्वतःला विशेष समजणाऱ्या, दीर्घोद्योगी, वक्तशीर, शिस्तप्रिय, बोलणे थोडे व मुद्देसूद, अरसिक अशा स्वभावाच्या असतात.
  • शाखा: प्राध्यापक, संशोधक, जज्ज, कारखानदार, मोठे व्यापारी.

१२) मीन रास

  • मीन राशी : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, बाराव्या क्रमांकाच्या मीन राशीचा स्वामी गुरू असून ही राशी जलतत्त्वाची, स्त्री, उत्तर दिशादर्शक, द्विस्वभावी, ब्राह्मण वर्णाची व सात्त्विक अशी आहे.
  • स्वरूप : उंच, बांधा मध्यम व आडवा, कपाळ मोठे, केसांची सुरुवात डोक्यावर बऱ्याच मागे, बोटे जाड, नाक ठसठशीत, डोळे पाणीदार, माशाप्रमाणे भित्रे, पांढरेशुभ्र दात, सुंदर, हसरा, मोठा चेहरा म्हणजे मीन व्यक्ती.
  • स्वभाव : मीन राशीच्या व्यक्ती आनंदी, शांत, भावनाप्रधान, दयाळू, थोड्या भित्र्या, सुस्त, समजूतदार, उदार, थोड्या चैनी, विलासी, गबाळ्या, कमी श्रम करणाऱ्या, सद्‌गुणी, धार्मिक, साधीभोळी, बावळट अशा स्वभावाच्या असतात.
  • शाखा : पौरोहित्य, कीर्तनकार, शिक्षक.

नक्षत्र विचार

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, आकाशातील काही विशिष्ट तारकांच्या समूहाला नक्षत्र म्हणतात. एकूण २७ नक्षत्रे आहेत. आकाशात स्थिर दिसणारी अशी नक्षत्रे असतात. एका राशीमध्ये सव्वादोन नक्षत्रे येतात. थोडक्यात, एक राशी म्हणजे ३०० व एक नक्षत्र म्हणजे १३ अंश २० कला होय. राशीपरत्वे प्रतित होणाऱ्या फलादेशापेक्षा नक्षत्रपरत्वे प्रतीत होणारा फलादेश जास्त सूक्ष्म असतो. हे सत्य आहे.

ज्योतिषशास्त्र मध्ये नक्षत्रांना खूप महत्त्व आहे. यासाठी नक्षत्रांचा, त्यांच्या स्वभावाचा व त्यांच्या स्वामीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

नक्षत्रांची नावे

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, २७ नक्षत्रांची नावे अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पु, आश्ले, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठ, पूर्वाषा, उत्तराषा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, रेभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा

विवाह विषयक विचार करताना विवाहाचा व स्त्रीचा कारक ग्रह शुक्र, पतिकारक ग्रह रवि, सप्तमेश व विवाहाच्या स्थानातील म्हणजे सप्तमातील ग्रह व चंद्र वरीलपैकी, कृत्तिका, आश्लेषा, ज्येष्ठा, मूळ या क्रूर नक्षत्रात असता वैवाहिक सुखात न्यूनत्व निर्माण करतात. विवाहाच्या बाबतीत काहीतरी अशुभ करतात.

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, शनिच्या नक्षत्रातील विवाह संबंधित ग्रह उदा., अनुराधा, पुष्य, उत्तराभाद्रपदा हे विवाह विलंब किंवा वैवाहिक सौख्यात असमाधान दाखवितात.


भावेश विचार

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, प्रत्येक स्थानात जी राशी असते, त्या राशीचा अधिपती जो ग्रह असतो तो त्या स्थानाचा भावेश किंवा मालक असतो. उदा., मेष लग्ना मध्ये सप्तम-स्थानामध्ये तूळ रास असल्याने तूळ राशीचा मालक शुक्र हा सप्तमेश होतो.

भावेश ग्रह हा पत्रिकेमध्ये त्याच्या स्थानात किंवा दुसऱ्या कोणत्याही स्थानात असतो. पत्रिका सोडविताना जास्तीत जास्त तर्कशास्त्राला वाव जर कोठे असेल तर तो भावेशात असतो. प्रत्येक भावावरून किंवा स्थानावरून ज्या गोष्टी पाहतात त्या गोष्टीचा अंतर्भाव त्या भावेशात असतो. भावेशाच्या स्थितीप्रमाणे या स्थानाचे मूल्यमापन करताना भावेश पत्रिकेतील दोन किंवा तीन स्थानांचा संबंध प्रस्थापित करणारा असतो.

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, विवाहाच्या दृष्टीने विचार करताना सप्तमेश, लग्नेश, धनेश व पंचमेश याचा विचार करावा लागतो, यांची स्थिती पाहावी.


भावेशाविषयी काही नियम

१) भावेश ह्या ग्रहात अनेक गुणधर्म असतात. भावेश कारकत्वाच्या माध्यमातून फळे देतो. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, भावेश जो ग्रह असतो त्या ग्रहाचे मूलभूत गुणधर्म तो त्या गोष्टीचा कारक असतो ते गुणधर्म असतात. ही गोष्ट प्रत्येक स्थानाचा भावेश अभ्यासताना अवश्य विचारात घ्यावी लागते.

उदा., सप्तमस्थानाचा कारक ग्रह शुक्र आहे. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, सप्तमेश कोणताही ग्रह असतो. परंतु वैवाहिक सौख्य, स्त्री, प्रेम, काम, वीर्य यांचा कारक शुक्र सप्तमेश झाल्यावर जे फल सांगण्यास येईल ते सप्तमेश शनि झाल्यावर असणार नाही. ग्रहाला कारकत्वाची नैसर्गिक जबाबदारी असते. त्याचप्रमाणे भावेशाची महत्त्वाची जबाबदारी असते.

२ ) भावेश ज्या स्थानात असतो त्या स्थानाचे वातावरण त्याला लाभते. भावेशाची प्रत्येक भावातील फले त्यानुसार असतात. भावेश स्वस्थानापासून दुसऱ्या कोणत्याही स्थानात गेल्यावर त्या दोन स्थानांचे विभिन्न संबंध प्रस्थापित करतो. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार,

उदा., पंचमेश दशमात गेल्यावर व्यक्ती शिक्षक, प्राध्यापक होण्याची जास्त शक्यता असते; याउलट षष्ठेश दशमात गेल्यावर डॉक्टर, वैद्य होण्याची शक्यता असते. तसेच सप्तमेश पंचमात, पंचमेश सप्तमात असता वैवाहिक सौख्य उत्तम मिळते. प्रेमविवाह होतो. तसेच सप्तमेश भाग्यात, भाग्येश सप्तमात असता विवाहानंतर उत्कृष्ट भाग्योदय होतो. पत्नी भाग्यवान, सुशील मिळते.

३) नीचभंग योग : भावेश स्वस्थान सोडून दुसऱ्या स्थानात गेल्यावर त्या स्थानाचा अधिपती कसा, कोणत्या राशीत आहे, त्याप्रमाणे त्याच्या स्थितीत फरक पडतो. एखाद्या स्थानाचा भावेश नीच राशीत असेल पण त्या नीच राशीचा मालक दुसऱ्या स्थानी उच्च राशीत किंवा मूळत्रिकोण राशीत असतो, तेव्हा तो नीच राशीतील भावेश शुभ फळे देतो.

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, उदा., प्रथम स्थानाचा अधिपती मंगळ कर्केत नीच राशीत असून कर्केचा स्वामी चंद्र कुंडलीत समजा वृषभ किंवा कर्क राशीत असेल तर मंगळाला नीच राशीत असूनसुद्धा शुभ फळे देण्यास वाव असतो. त्यास नीचभंग योग म्हणतात. ह्याच्या उलट भावेश ज्या राशीत असतो, त्या राशीचा अधिपतीसुद्धा नीच राशीत असेल तर अशुभ फळे तीव्रतेने मिळतात.

४) भावेश त्या भावाच्या कारक ग्रहाबरोबर युतीत असेल तर त्या भावावरून ज्या गोष्टीचा विचार करतात त्या गोष्टीबाबत शुभ फळे मिळतात. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, उदा., सप्तमस्थानावरून पत्नी, विवाह, वैवाहिक सौख्य यांचा विचार करतात. त्याचप्रमाणे शुक्र हासुद्धा विवाहाचा कारक ग्रह आहे.

Marriage delay
Marriage delay

जेव्हा सप्तमेश कोणताही ग्रह शुक्राबरोबर युतीत असतो तेव्हा विवाहविषय शुभ फळे मिळतात. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, त्याचप्रमाणे पंचमेश गुरूबरोबर असेल, दशमेश रविबरोबर असेल तर त्या स्थानाची उत्कृष्ट फळे मिळतात.

५) शुभ कर्तरी योग : एखाद्या स्थानाच्या द्वितीयात व व्ययात ग्रह असता ते स्थान दोन ग्रहांच्या कर्तरीत आहे असे म्हणतात. हे ग्रह शुभ ग्रह असतील तर शुभ कर्तरी योग व पापग्रह असतील तर पापकर्तरीत योग होतो. हे योग कारक स्थानाशी संबंधित व कारक ग्रहांच्या संबंधित अभ्यासावेत.

उदा., षष्ठात शनि व अष्टमात मंगळ असेल तर सप्तम-स्थान दोन पापग्रहांच्या पापकर्तरी योगात आहे. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, त्यामुळे वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अशुभ फळे मिळतील. तसेच हा नियम कारक ग्रहांना लागू केल्यास वैवाहिक सौख्याचा कारक ग्रह शुक्र दोन-पापग्रहांच्या पापकर्तरीत असता वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अशुभ फळे मिळतील.

हीच गोष्ट भावेशाला पण लागू आहे. सप्तमेश पापग्रहांच्या कर्तरीत असता सप्तमस्थानाच्या दृष्टीने वैगुण्य येते. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, याउलट शुभग्रहांच्या कर्तरीत एखादे स्थान, त्या स्थानाचा भावेश व कारक ग्रह असता शुभफळे द्विगुणीत होतात.

६) भावेश ज्या राशीत पडतो त्या राशीप्रमाणे त्या भावाचा व भावेशाचा विचार करावा. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, षष्ठस्थान हे रोगाचे स्थान, त्यामुळे षष्ठेश कुंडलीमध्ये जर अग्निराशीत गेला तर अग्नितत्त्वाला प्राधान्य द्यावे. उदा., वृश्चिक लग्नास षष्ठेश मंगळ जर दशमात सिंह राशीत असेल तर भाजणे, कापणे, रक्तरत्राव, मोडणे, वाहन अपघात, ऑपरेशन असे भाकीत करता येईल.

७) भावेश ज्या ग्रहाबरोबर असतो त्या भावाच्या फलादेशात फरक करावा लागतो. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, उदा., चतुर्थस्थानाचा अधिपती (चतुर्थेश) राहुयुक्त असल्यास चतुर्थस्थानाचा दृष्टीने वैगुण्य येते तर दशमेश गुरूयुक्त, रवियुक्त असल्यास दशमस्थानच्या दृष्टीने शुभ फळे मिळतात. तसेच एखादा भावेश १, ४, ५, ९, १० या अधिपतीने युक्त असल्यास शुभफलदायी होतो. याउलट एखाद्या भावेश ६, ८, १२ स्थानाच्या अधिपतीने युक्त असता त्यात वैगुण्य येते. अशुभ फळे मिळतात.

८) कोणताही भावेश केंद्र व त्रिकोण स्थानी शुभफळे देतो. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, त्या खालोखाल तृतीय व लाभस्थानी असता शुभफळे देतो. याउलट कोणताही भावेश ६, ८, १२ या स्थानी गेला तर अशुभ फलदायी असतो.

९) ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, कोणताही भावेश शुभ ग्रहांनी युक्त व दृष्ट असता तसेच स्वराशीत, उच्च किंवा मूळ त्रिकोण राशीत असता शुभ फलदायी तर कोणताही भावेश पापग्रहयुक्त, दुष्ट असता व नीच राशीत, शत्रू राशीत, अस्तंगत असता अशुभ फलदायी ठरतो.

१०) सप्तमेशाचे ६, ८, १२ स्थानाच्या भावेशासंबंधी होणारे अन्योन्य योग, वैवाहिक सौख्य नष्ट करते.

उदा.,
षष्ठेश- सप्तमात, सप्तमेश-षष्ठात
अष्टमेश-सप्तमात, सप्तमेश-अष्टमात
व्ययेय-सप्तमात, सप्तमेश-व्ययात असता अत्यंत अशुभ फळे मिळतात.


ग्रहांचे बलाबल

फलादेश सांगण्यासाठी कुंडलीतील भावाप्रमाणे ग्रहांचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, आता आपण ग्रहांची, फळे देताना काय भूमिका असते व कशी असते ते पाहणार आहोत. फळ देताना ग्रह कधी बलवान तर कधी निर्बली असतात. ग्रहांचे एकमेकांशी संबंध राशीप्रमाणे, भावाप्रमाणे कसे असतात (योग) व त्यांची उच्च-नीचता व शत्रू-मित्रता येथे पाहावयाची आहे.

ग्रहग्रहांची स्वराशीग्रहांची उच्च राशीग्रहांची मूळ त्रिकोण राशीग्रहांची नीच राशी
१) सूर्यसिंह राशीमेष राशीसिंह राशीतुला राशी
२) चंद्रकर्क राशीवृषभ राशीवृषभ राशीवृश्चिक राशी
३) मंगळमेष राशी, वृश्चिक राशीमकर राशीमेष राशीकर्क राशी
४) बुधमिथुन राशी, कन्या राशीकन्या राशीकन्या राशीमीन राशी
५) गुरुधनु राशी, मीन राशीकर्क राशीधनु राशीमकर राशी
६) शुक्रवृषभ राशी, तुला राशीमीन राशीतुला राशीकन्या राशी
७) शनिमकर राशी, कुंभ राशीतुला राशीकुंभ राशीमेष राशी
८) राहूकन्या राशीमिथुन राशीकन्या राशीधनु राशी
९) केतूमीन राशीधनु राशीधनु राशीमिथुन राशी
१०) हर्षलकुंभ राशी———
११) नेपच्यूनकर्क राशी———
१२) प्लुटो————

१) ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, कोणताही ग्रह स्वतःच्या मालकीच्या राशीत किंवा स्वराशीत कुंडलीत कोठेही असतो, तेव्हा तो बलवान असतो.

२) कोणताही ग्रह आपल्या स्वराशीपासून सातव्या राशीत असता तेव्हा तो हिनबली असतो.

३) कोणताही ग्रह कुंडलीत उच्च राशीत, मूळ त्रिकोण राशीत व मित्रांच्या राशीत असता तो बलवान, शुभ फलदायी असतो.

४) ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, कोणताही ग्रह कुंडलीत नीच राशीत, शत्रूराशीत असता तो अशुभ फलदायी असतो.

५) ग्रहांच्या राशींच्या बलाप्रमाणे ग्रह कोणत्या स्थानात बसले आहेत, यावरही शुभ-अशुभ फलादेश अवलंबून असतो. कारण ग्रहाची स्थानगत फळे महत्त्वाची असतात. ग्रह जर स्वस्थानी असेल किंवा स्वतःच्या भावामध्ये असेल तर तो नक्कीच शुभदायी असतो.

ग्रह मिळणारी फले
उच्च ग्रहपूर्ण फले देतात – १००%
मूळ त्रिकोण राशीतील ग्रह३/४ फले देतात ७५%
स्वराशी ग्रह१/२ फले देतात ५०%
मित्र राशीतील ग्रह१/४ फले देतात २५%
शत्रू राशीतील ग्रह१/१६ फले देतात ६%
नीच राशीतील ग्रह काहीच फले देत नाहीत ०%

ग्रहांची दृष्टी

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, फल ज्योतिषशास्त्र मध्ये ग्रहांच्या दृष्टीचा विचार (अभ्यास) करणे अनिवार्य ठरते. कारण ग्रहांच्या शुभ-अशुभ दृष्टीमुळे कुंडलीतील ग्रहांवर व त्यांच्या फलादेशावर नक्कीच इष्ट-अनिष्ट परिणाम होतो. यासाठी आपण आता प्रत्येक ग्रहाच्या दृष्टीचा अभ्यास करू.

१) सूर्य : सूर्य हा ग्रह ज्या स्थानात असेल त्या स्थानापासून तो सप्तम-स्थानावर संपूर्ण दृष्टीने पाहतो. सूर्य हा सौम्य पापग्रह असल्याने ह्याची दृष्टी अशुभ असते.

२) चंद्र: चंद्र हा ग्रह ज्या स्थानी असेल त्या स्थानापासून तो सप्तम-स्थानावर संपूर्ण दृष्टीने पाहतो. चंद्र हा शुभ ग्रह असल्याने याची दृष्टी शुभ असते.

३) मंगळ : मंगळ हा ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच तो ज्या स्थानात असेल त्या स्थानापासून सप्तमस्थानावर पूर्ण दृष्टीने पाहतो तसेच तो स्वस्थानापासून चतुर्थ व अष्टमस्थानावरही पूर्ण दृष्टीने पाहतो. मंगळ

४) बुध : बुध हा ग्रह ज्या स्थानात असतो त्या स्थानापासून तो सप्तम-स्थानावर पूर्ण दृष्टीने पाहतो. बुधाची दृष्टी शुभ असते.

५) गुरू : गुरू हा ग्रह ज्या स्थानात असतो त्या स्थानापासून तो सप्तम-स्थानावर पूर्ण दृष्टीने पाहतो व तो स्वस्थानापासून पंचम व नवम-स्थानावरही पूर्ण दृष्टीने पाहतो. गुरू हा धनु आणि मीन या स्वराशीत ज्या स्थानात पडतो ते स्थान सोडून इतर कोणत्याही राशीत गुरू कोणत्याही स्थानी पडतो तेव्हा तो त्या स्थानाचे अशुभ फळ निर्माण करतो.

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, थोडक्यात गुरू स्थानहानी करतो. परंतु गुरू हा अत्यंत शुभ ग्रह असल्याने गुरूची ५/७/९ ही दृष्टी अमृतदायी, अतिशय शुभ असते.

६) शुक्र : शुक्र हा ज्या स्थानात असेल त्या स्थानापासून तो सप्तम-स्थानावर पूर्ण दृष्टीने पाहतो. हा शुभ ग्रह असल्याने त्याची दृष्टी शुभअसते.

७) शनि : शनि हा ज्या स्थानात असेल त्या स्थानापासून तो सप्तम-स्थानावर पूर्ण दृष्टीने पाहतो. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, तसें तो स्वस्थानापासून तृतीय व दशम या स्थानावरही पूर्ण दृष्टीने पाहतो शनि हा अतिपापग्रह असल्याने तो ज्या स्थानामध्ये असतो त्या स्थार्न शुभ फलदायी मात्र ज्या स्थानावर ३/७/१० या दृष्टीने पाहतो त्या स्थानांचा तो नाश करतो. म्हणजेच त्याची दृष्टी अतिअशुभ असते. गुरुरुच्या उलट शनिची भूमिका असते.

८) राहु / केतु : राहु व केतु हे ज्या स्थानात असतील त्या स्थानापासून ते सप्तम स्थानावर पूर्ण दृष्टीने राहतात. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, राहु ५/९/१२ या स्थानांवर पूर्ण दृष्टीने पाहतो. राहु हा पापग्रह असल्याने राहुची दृष्टी अशुभच समजतात.


ग्रहांच्या दृष्टिविषयी

विवाहविषयक पत्रिका सोडविताना ग्रहांच्या दृष्टीचा विचार करणे अनिवार्य ठरते. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, सूर्य, शनि, मंगळ, राहु, केतु, हर्षल या पापग्रहांच्या दृष्ट्या सप्तमस्थानावर, सप्तमेशावर, चंद्रावर व शुक्रावर पडत असतील तर विवाहविषयक बाबतीमध्ये काहीतरी न्यूनत्व किंवा अशुभ फळ मिळते.

तसेच गुरु व शुक्र या शुभ ग्रहांच्या दृष्ट्या विवाहसंबंधित वरील गोष्टींवर पडल्यास उत्तम वैवाहिक सौख्य मिळते. तसेच विवाहसंबंधित गोष्टीत अनुकूल फळे मिळतात. गुरुची शुक्रावर शुभ दृष्टी असता व पत्रिकेत शुक्र बिघडलेला असला तरी व्यक्तीचे नैतिक आचरण चांगले राहते. भावनांवर नियंत्रण राहते.

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, ग्रहांचे योग ही स्वतंत्र विचारपद्धती ह्या दृष्टीतत्त्वातून व स्थानाच्या अभ्यासातून निघालेली आहे. ग्रहांची एकमेकांपासूनची जी स्थिती असते, त्याप्रमाणे ग्रहांचे परिणाम होत असतात. फल ज्योतिषशास्त्र मध्ये ग्रहांच्या दृष्टीबरोबर ग्रहांच्या योगांचाही अभ्यास करणे अनिवार्य ठरते व यासाठीच ग्रहांचे योग पाहिल्याशिवाय अचूक भविष्य सांगता येत नाही. आता आपण येथे दोन ग्रहांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अंशात्मक अंतर असते तेव्हा कोणकोणते योग निर्माण होतात तसेच त्याचे शुभाशुभत्व पाहू. योग खालीलप्रमाणे आहेत-

१) युती, २) द्विद्वीक्षक योग, ३) त्रिरेकादश (लाभयोग), ४) केंद्र, ५) नवपंचम योग, ६) षडाष्टक योग, ७) समसत्क योग (प्रतियुती)

१) युतीयोग : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, जेव्हा दोन ग्रह हे एकाच राशीत एकाच अंशात असतात तेव्हा त्यास युतियोग म्हणतात.

२) द्विद्वीक्षक योग : जेव्हा दोन ग्रहांमध्ये ३०० चे अंतर असते किंवा दोन ग्रह एकमेकांपासून १ व १२ अंतरावर असतील, त्यावेळी त्या योगास द्विद्वादर्शक योग म्हणतात.

३) त्रिरेकादश (लाभयोग): ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, जेव्हा दोन ग्रहांमध्ये ६० अंशांचे अंतर असते किंवा दोन ग्रह एकमेकांपासून ३ व ११ अंतरावर असतील, त्यावेळी त्यास त्रिरेकादश (लाभयोग) म्हणतात.

४) केंद्र योग : जेव्हा दोन ग्रहांमध्ये ९० अंशाचे अंतर असते किंवा दोन ग्रह एकमेकांपासून ४ व १० अंतरावर असतात, त्यावेळी त्या योगास केंद्रयोग म्हणतात.

५) नवपंचम योग : जेव्हा दोन ग्रहांमध्ये १२० अंशांचे अंतर असते किंवा दोन ग्रह एकमेकांपासून ५ व ९ अंतरावर असतील. तेव्हा त्या योगाला नवपंचम योग म्हणतात.

६) षडाष्टक योग : ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, जेव्हा दोन ग्रहांमध्ये १५० अंशांचे अंतर असते किंवा दोन ग्रह एकमेकांपासून ६ व ८ अंतरावर असतील, तेव्हा त्या योगाला षडाष्टक योग म्हणतात.

७) समसप्तक योग (प्रतियुती): जेव्हा दोन ग्रहांमध्ये १८० अंशांचे अंतर असते किंवा दोन ग्रह एकमेकांपासून ७ व ७ अंतरावर असतात, त्यावेळी त्या योगाला समसप्तक योग किंवा प्रतियुती म्हणतात.


योगांविषयी

१) सामान्यतः युतियोग, लाभयोग, नवपंचम योग, द्विद्वादर्शक योग हे कुंडलीतील शुभ योग असतात.

२) सामान्यतः प्रतियुति, षडाष्टक, केंद्रयोग हे कुंडलीतील अशुभ योग असतात.

३) शुभ ग्रहांचे युतियोग शुभ फलदायी असतात, तर अशुभ ग्रहांचे युतियोग अशुभ फलदायी असतात.

४) अशुभ ग्रहांचे केंद्रयोग, प्रतियुती, षडाष्टक योग, अतिअशुभ असतात. उदा. रवि-शनि, शनि-मंगळ, रवि-राहु इ.

५) शुभ ग्रहांचे शुभ योग उत्तम फलदायी असतात. तर शुभ व पापग्रहांचे शुभ योग मिश्रफळे देतात. तसेच पापग्रहांचे शुभ योग कष्टाने शुभफळे देतात.

६) पाप किंवा शुभग्रहांचे अशुभ योग अशुभ फळे देतो. तसेच नुसत्या पापग्रहांचे अशुभ योग तीव्र अशुभ फळे देतात.

७) दोन ग्रहांचे योग पाहताना त्यांची अंशात्मक स्थिती अवश्य पाहावी.

८) ग्रहयोगांचा अभ्यास करताना योग कोणत्या राशीतून व कोणत्या दोन स्थानातून होतात याचा विचार करून योगाची फळे जाणावीत.

९) दोन पापग्रहांच्या प्रतियुती अतिशय अशुभ असतात, त्यातल्या त्यात धन-स्थान व अष्टमस्थान तसेच षष्ठस्थान व व्ययस्थान यातून दोन पापग्रहांची होणारी प्रतियुती तीव्र अशुभ फलदायी होते.

१०) विवाहविषयक बाबतीत पत्रिका सोडविताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रहांचे एकमेकांशी होणारे योग होय. योगांच्या अभ्यासाशिवाय पत्रिकेचे अचूक विश्लेषण होऊ शकत नाही. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, विवाहसंबंधित पत्रिका बघताना शुक्र, सप्तमेश व सप्तमातील ग्रह इत्यादींशी होणारे इतर ग्रहांचे योग अभ्यासावे लागतात.

उदा., सप्तमात जर शनि, मंगळ सारखे ग्रह मूळ, ज्येष्ठा इत्यादी क्रूर नक्षत्रात असता विवाह न होणे किंवा वैवाहिक सौख्याची हानी इ. भाकीत केले जाते. परंतु सर्वच पत्रिकेमध्ये असे झालेले पाहावयास मिळत नाही. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, अशा वेळी पत्रिकेतील ग्रहाचे योगच कारणीभूत ठरतात. अशा वेळी सप्तमातील वरील ग्रहांशी इतर ग्रहांचे नवपंचम व लाभयोग असे शुभ योग झाल्यास विवाहसंबंधित शुभ फळे पाहावयास मिळतात.


Mangal Dosha
Mangal Dosha

नवमांश विचार

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, एकूण १२ राशी व २७ नक्षत्रे आहेत. याचा अर्थ प्रत्येक राशीत सव्वादोन नक्षत्रे येतात. एका नक्षत्राचे चार चरण असतात. म्हणजेच एकूण २७ नक्षत्रांचे १०८ चरण होतात. याप्रमाणे प्रत्येक राशीत ९ चरणे येतात. म्हणूनच या प्रत्येक चरणास ‘नवमांश’ असे म्हणतात. नवमांश म्हणजे एका राशीचा नववा भाग आहे.

पत्रिकेत एका स्थानामध्ये एक रास असते. रास व स्थान ३० अंश असते. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, जेव्हा एखादा ग्रह एखाद्या राशीत लग्नकुंडलीत असतो, तेव्हा तो ग्रह नवमांश कुंडलीमध्ये त्या राशीत किंवा वेगळ्या राशीत पडतो. फलादेश सांगताना ग्रहाच्या राशीगत फलांचा विचार करतात. परंतु ग्रहाला मिळालेल्या नवमांश राशीचा विचार केल्यास सूक्ष्म फलादेश आपणास पाहावयास मिळतो. यासाठी नवमांश कुंडली महत्त्वाची ठरते.


नवमांश कुंडलीविषयी काही नियम

१) मूळ जन्मकुंडलीत असलेला ग्रह नवमांश कुंडलीमध्ये त्याच राशीत पडला असता तो कुंडलीतील वर्गोत्तम ग्रह असतो व तो अत्यंत शुभफलदायी ठरतो.

२) एखादा ग्रह नवमांशात ज्या राशीत असतो त्या वेळी तो ग्रह त्या राशीच्या अधिपती ग्रहाशी युती करतो असे फळ देतो. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, उदा., नवमांश कुंडलीत शुक्र मेष राशीत असता शुक्र-मंगळ युतीचे फळ मिळते.

३) एखादा भावेश ज्या नवमांशात पडतो त्या नवमांशाच्या अधिपती ग्रहाशी युती करतो, असे फळ देतो. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, उदा., लग्नकुंडलीचा सप्तमेश मंगळ, नवमांश कुंडलीत कुंभ राशीत असेल तर शनि-मंगळ युतीचे फळ सप्तमस्थानाच्या दृष्टीने मिळते.

४) एखादा भावेश नवमांशात ज्या ग्रहाबरोबर असतो त्या ग्रहांशी तो युती करतो, असे फळ मूळ लग्नकुंडलीच्या भावानुसार मिळते. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, उदा., लग्नेश शनि नवमांशात रविबरोबर युतीत असेल तर रवि-शनि युतीचे फळ लग्नस्थानानुसार मिळते. तसेच सप्तमेश मंगळ नवमांशात शनिबरोबर युतीत असेल तर शनि-मंगळ युतीचे फळ सप्तमस्थानानुसार मिळते.

५) एखादा ग्रह नवमांशांत ज्या राशीत असतो किंवा ज्या ग्रहाबरोबर असतो किंवा ज्या ग्रहाच्या दृष्टीत असतो, त्यानुसार शुभाशुभ फळ मूळ कुंडलीचे स्थान आणि कारकत्व याला अनुसरून मिळते. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, उदा. शुक्र हा मंगळाच्या नवमांशात हर्षलबरोबर असेल तर शुक्र विवाहकारक या दृष्टीने शुक्र-मंगळ हर्षल या युतीचे फळ त्या जातकास मिळते.

६) नवमांशाचा बऱ्याचदा कालनिर्णयासाठी उपयोग होतो. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, उदा., सप्तमेश गुरू कर्क नवमांशात असेल तर चंद्र-गुरू युतीची शुभफळे गुरूच्या महादशेत, चंद्राच्या अंतर्दशेत किंवा चंद्राच्या महादशेत गुरूच्या अंतर्दशेत मिळतील.

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, याप्रमाणे नवमांशाचा सूक्ष्म विचार करून भाकितापर्यंत पोहोचता येते.


विशोत्तरी महादशा विचार

आपल्याकडून मागील जन्मी जी काही बरी-वाईट कर्मे घडली असतात, त्यांचा या जन्मी कोणता परिणाम भोगावा लागेल, हे दाखविणारा आदर्श तक्ता म्हणजेच पत्रिका होयः परंतु पत्रिकेवरून या जन्मी भोगावा लागणारा परिणाम जरी समजला तरी तो या जन्माच्या आयुष्यात केव्हा भोगावा लागेल, हा कालनिर्णय समजणे अत्यंत आवश्यक असते. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, आपल्या प्राचीन ज्योतिषग्रंथात दशासाधन हे याचकरिता सांगण्यात आले आहे. त्या दशा अनेक प्रकारच्या असल्या तरी विशोत्तरी महादशेप्रमाणे फलादेश जास्त वेळा अचूक जमतो.

जन्मवेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्रस्वामीची जातकास जन्मस्थ महादशा असते. प्रत्येक नक्षत्राचे स्वामी पुढीलप्रमाणे आहेत-

नक्षत्रनक्षत्रनक्षत्रनक्षत्र स्वामीमहादशा वर्ष
अश्विनीमघामूळकेतू०७
भरणीपूर्वा पूर्वाषाढाशुक्र२०
कृतिकाउत्तराउत्तराषाढासूर्य०६
रोहिणीहस्तश्रवणचंद्र१०
मृगचित्राधनिष्ठामंगळ०७
आर्द्रास्वातीशततारकाराहू१८
पुनर्वसूविशाखापूर्वा भाद्रपदागुरु१६
पुष्यअनुराधाउत्तरा भाद्रपदाशनि१९
आश्लेषाजेष्ठारेवतीबुध१७

महादशा अंतर्दशेचा शुभाशुभ विचार

ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार,

१) प्रत्येक लग्नानुसार राजयोगकारक ग्रहाची महादशा शुभकारक राजयोगकारक जाते.

२) लग्नेश, दशमेश या ग्रहाच्या दशा, अंतर्दशा शुभ फलदायी जातात.

३) केंद्र कोनाधिपतीची दशा, अंतर्दशा शुभ फलदायी जाते. उदा., तूळ लग्नास शनिच्या महादशेत बुधाची अंतर्दशा व बुधाच्या महादशेत शनिची अंतर्दशा अत्यंत शुभ फलदायी ठरते.

४) जन्मकुंडलीत दोन ग्रहामध्ये शुभ योग असेल तर त्या ग्रहांच्या परस्पर महादशा अंतर्दशा शुभ फलदायी ठरतात. ज्योतिष शास्त्रासंबधी प्राथमिक माहिती नुसार, उदा., जन्मकुंडलीत रवि-गुरूचा नवपंचम किंवा लाभयोग असेल तर रविमहादशेत गुरू किंवा गुरुच्या महादशेत रवि अंतर्दशेचा काळ यशदायक जातो.

५) ६, ८, १२ स्थानांच्या अधिपतीच्या तसेच मारकेश, बाधकेश ग्रहांच्या दशा अशुभ फलदायी जातात.

६) दोन पापग्रहांचे कुयोग असतील तर त्यांच्या दशा, अंतर्दशा अशुभफलदायी जातात.

७) राहु-केतु हे ज्या नक्षत्रात असतात किंवा ज्या राशीत असतात, त्या नक्षत्रस्वामी किंवा राशीस्वामीप्रमाणे शुभाशुभ फळे देतात. उदा., तूळ लग्नाच्या कुंडलीत मकर राशीत राहु असता राजयोगकारक शनिच्या या राशीतील राहु हा राजयोगकारक शनिचीच शुभ फळे आपल्या दशेत देतो.

८) इतर कोणत्याही महादशेची फळे अचूक शुभ किंवा अशुभ नाही मिळाली तरी राहु महादशा व्यक्तीच्या जीवनावर नक्की परिणाम करते. या महादशेत शुभ-अशुभ परिणाम नक्की होतात.

९) ज्या ग्रहाची महादशा चालू आहे. त्या ग्रहाशी मूळ कुंडलीत केंद्र, षडाष्टक योग करणाऱ्या ग्रहांच्या अंतर्दशा अशुभ फलदायी जातात. उदा. रविची महादशा असून मूळकुंडलीत रवि शनियुती, षडाष्टक, केंद्रयोग किंवा प्रतियुती असता रविच्या महादशेत शनिची अंतर्दशा अत्यंत वाईट जाते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

१) प्रश्न: ज्योतिष म्हणजे काय?

उत्तर:- पारंपरिक वैदिक परंपरेनुसार ग्रह, राशी, नक्षत्र आणि जन्मकुंडलीच्या अभ्यासावर आधारित शास्त्राला ज्योतिषशास्त्र म्हणतात.

२) प्रश्न: जन्मकुंडली म्हणजे काय?

उत्तर:- जन्मवेळी ग्रह आणि राशींची स्थिती दर्शविणारा नकाशा म्हणजे जन्मकुंडली.

३) प्रश्न: कुंडलीमध्ये किती भाव असतात?

उत्तर:- जन्मकुंडलीमध्ये एकूण १२ भाव असतात.

४) प्रश्न: वैदिक ज्योतिषात किती ग्रहांचा विचार केला जातो?

उत्तर:- या लेखानुसार एकूण १२ ग्रहांचा विचार करण्यात आला आहे.

५) प्रश्न: राशी किती असतात?

उत्तर:- वैदिक ज्योतिषात १२ राशी मानल्या जातात.

६) प्रश्न: नक्षत्रे किती आहेत?

उत्तर:- वैदिक ज्योतिषात २७ नक्षत्रे मानली जातात.

७) प्रश्न: भावेश म्हणजे काय?

उत्तर:- ज्या राशीचा स्वामी ग्रह एखाद्या भावावर अधिपत्य ठेवतो, त्या ग्रहाला त्या भावाचा भावेश म्हणतात.

८) प्रश्न: ग्रहांची दृष्टी म्हणजे काय?

उत्तर:- ग्रह ज्या भावांवर प्रभाव टाकतात त्या प्रभावाला ग्रहदृष्टी असे म्हटले जाते.

९) प्रश्न: ग्रहयोग म्हणजे काय?

उत्तर:- दोन किंवा अधिक ग्रहांच्या विशिष्ट स्थानसंबंधातून तयार होणाऱ्या स्थितींना ग्रहयोग म्हणतात.

१०) प्रश्न: ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी सुरुवात कुठून करावी?

उत्तर:- ग्रह, राशी, भाव, नक्षत्र आणि जन्मकुंडली या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करून सुरुवात करावी.

ज्या व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात उर्जा हवी आहे त्याच्यासोबत शेअर करा!

मार्गदर्शन :

रोज अश्याच नव नवीन माहिती मिळवण्यासाठी

WhatsApp Group Join करा

गुरुजींशी बोला

वैयक्तिक कुंडली सल्ला

जन्मकुंडली, विवाह जुळणी व ग्रहदोष निवारणासाठी वेळ ठरवा.

संबंधित लेख

श्रेणी

सल्ल्यासाठी माहिती पाठवा

अधिक अचूक विश्लेषणासाठी पूर्ण नाव, जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्मस्थळ द्या.

सेवा *
सल्ला कसा हवा? *

पत्ता

Ridhhi Sidhhi Astrology Solutions

१०-ब, स्टेट बँक कॉलोनी,
जय अंबे टायर समोर,
देवपूर, धुळे – ४२४००२

आपल्या प्रश्नांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन देण्यासाठी Ridhhi Sidhhi Astrology Solutions सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहे.

error: Content is protected !!